एक्स्प्लोर

खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी घेतले त्याचं केंद्र, राज्याने काय केलं : खासदार उदयनराजे

कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे यांनी केंद्रासह राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

सातारा : राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

कोरोनामुळे रुढी परंपरेला फाटा, जिव्हाळा, पाहुणे, मित्रमंडळी यांना या कोरोनाने हिरावले आहे, आईचरणी प्रार्थना आहे हे थांबलं पाहिजे. ज्याला दोन दिवसापूर्वी भेटलो ते दुसऱ्या दिवशी जातात याचं वाईट वाटतं. असे प्रत्येकावर क्षण आलेत, त्यात मी अपवाद नाही. यामुळे बुद्धी काम करायची बंद होते, खरंही वाटत नाही जो काल होता तो आज नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, अशी विनंती खासदार उदयनराजे यांनी केली.

त्या निधींचं केंद्र आणि राज्यानं काय केलं? : उदयनराजे

खासदार आणि आमदारां तुम्ही दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले त्याचं केंद्र आणि राज्य सरकारनं काय केलं ते गेले कुठे? दिवस रात्र एकच झाली आहे. आम्हाला बेड पाहिजेत, ऑक्सिजन पाहिजेत, असे फोन येतात. माझा एकच प्रश्न हे घोटून घेतलेले पैसे गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत. याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे. आता लोकांनी जाब विचारणं गरजेचे आहे.

Corona | भारतात रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर; देशभरात जवळपास 71 लाख रुग्ण कोरोनामुक्त

राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी.. गरीबांना जाऊन भेटतो तेव्हा ते म्हणतात आम्ही आता अंत्यसंस्काराची तयारी करत आहोत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. थोडी लाज असेल तर संपूर्ण राज्यकर्त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत. हे पैसे कोठून आणणार. इतकी लोकं का मरत आहेत? गोरगरीब कुठून चार आणि पाच लाख रुपये आणणार (बाईट सुरु असतानाच उदयनराजेंचे देवीला हात जोडून साकड) हे देवी या राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी द्या आणि सांगा त्यांना ज्या लोकांना या जनतेने निवडून दिलयं त्यांची काळजी घ्या.

तुम्ही जर त्या विश्वासाला पात्र राहिला नाही तर तुमची त्या पदावर राहायची लायकी नाही. गाडी थांबवल्यावर लोकं विचारतात तुम्ही काय करता? त्यांना काय उत्तर देऊ. तुम्ही तर सगळ कलेक्टरच्या हातात दिलंय. त्यांनी थोडातरी आमचा अभिप्राय घेतला पाहिजे. तुम्ही राबवणार कशी ही सर्व यंत्रणा. रेव्हिनीव डिपार्टमेंटचा काय संबंध. हा पैशाचा नुसता खेळ चाललाय. कोठे जातात हे पैसे ते तपासले पाहिजेत. घेतायत तर त्याला जबाबदार कोण? अशी परिस्थिती तुमच्यावर (लोकप्रतिनिधींवर) आली तर तुम्ही काय करणार? अशी परिस्थिती कोणावर येऊ नये अशी देवी चरणी मी प्रार्थना करतो, असे उदयनराजे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget