एक्स्प्लोर

Sanjay Raut: लाडकी बहीण योजनेबद्दलची ती पोस्ट करणं संजय राऊतांना भोवणार? पोलिसांकडून गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Sanjay Raut: लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर अनेकदा टीका करताना दिसतात, मात्र या योजनेबाबत केलेल्या एका पोस्टमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चित्र दिसत आहेत.

मुंबई: राज्यात सर्वत्र सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे. या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर अनेकदा टीका करताना दिसतात, मात्र या योजनेबाबत केलेल्या एका पोस्टमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चित्र दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवल्याबाबतची तक्रार संजय राऊतांविरोधात करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडल्याचा खोटा दावा राऊतांनी केला होता. याप्रकरणी भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर संजय राऊत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सजंय राऊत यांनी ‘लाडकी बहीण’ योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी म्हणजे 7 आक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे.

मध्यप्रदेशात सरकार दरमहा लाडक्या बहिणींच्या खात्यात 1250 रुपये देत 

भाजप नेते पुढे म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1250 रुपये दिले जात आहेत. भाजप सरकार भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी भाजप सरकार महिलांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे.

काय म्हणाले भोपाळचे अतिरिक्त डीसीपी?

या प्रकरणाबाबत भोपाळ येथील क्राइम ब्रँचचे अतिरिक्त डीसीपी शैलेंद्र सिंह चौहान म्हणाले की, आम्हाला काही लोकांकडून तक्रारी आल्या होत्या की, काही नेते सरकारच्या धोरणांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही बीएनएस कलम 353(2), 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget