एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर घरी बसा, राजू शेट्टींचा थेट मोदींवर निशाणा

पंढरपूर : "हजारो कोटी रुपयाची कर्जे बुडवणाऱ्या उद्योगपतींची नावे केवळ देशाची बदनामी होते म्हणून जाहीर केली जात नाहीत. सातव्या आयोगासाठी 3 टक्के नोकरदारांना वर्षाला 1 लाख 15 हजार कोटींची वाढ देता, मात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास टाळाटाळ करणारे मोदी पुढच्या वेळी मते मागायला येतील, तेव्हा देशातील 62 टक्के शेतकरी त्यांना याचा जाब विचारेल. त्यामुळे एकतर कर्जमुक्ती द्या नाहीतर घरी बसा हे म्हणावे लागेल." असा सणसणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. भीमनगरमधील कर्जमुक्ती परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. आता कर्जमुक्ती मुद्द्यावर कोणाशीही संघर्ष करण्यास आपण तयार असल्याचे सांगत यासाठी देशभरातील सर्व शेतकरी संघटनानी एकत्रित हा लढा उभारला असून वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू, असे शेट्टींनी सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांना मते मागायला यायचे असेल, तर सात-बारा कोरा करावा लागेल, नाहीतर त्यांना घरी बसा सांगावे लागेल, अशी टीका राजू शेट्टींनी केली. केवळ दोन एकर कोरडवाहू शेती असलेल्या सदाभाऊंचा उल्लेख करत कष्ट केल्यावर मंत्रिपद मिळतं, असा सल्ला देखील राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिला. देशभरातील सर्व शेतकरी संघटना कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मुद्द्यावर एकवटल्या असून हा निर्णय केंद्र सरकारला घेण्यास भाग पाडू असेही यावेळी शेट्टी यांनी सांगितले. "देशभरातील शेतकरी कर्जबाजारी होण्यास समाज आणि चंगळवादी लोके जबाबदार असल्याचे सांगताना यांच्या चंगळवादामुळे, वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले असून यामुळेच निसर्गचक्र बिघडले आहे. शेतकरी पिक घेतो मात्र त्याच्या दराबाबत सरकार हस्तक्षेप करते आणि दर पाडते यामुळे कर्जे काढून देखील त्याला पैसे मिळत नाहीत तर दुसऱ्या बाजूला निसर्ग अडचणीत आणतो यामुळे या कर्जाला शेतकरी जबाबदार नाही." राजू शेट्टी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget