मला आमदार व्हायचं होतं पण खासदार झालो, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य
मला आमदार व्हायचं होतं परंतू, मी खासदार झालो, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केलं आहे.

MP Naresh Mhaske : मला आमदार व्हायचं होतं परंतू, मी खासदार झालो, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केलं आहे. देवाच्या मनात, तुमच्या सगळ्याचा आशिर्वाद होता म्हणून मला खासदार होण्याची संधी मिळाल्याचे म्हस्के म्हणाले. जो जो पुढे जात असेल, नेतृत्व करत असेल त्याच्या पाठीमागे उभे राहा असेही ते म्हणाले. महाड इथं नायक मराठा समाज सेवा संस्थेच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात म्हस्के बोलत होते. आपल्याला शैक्षणिक संस्थांची गरज आहे. नायक मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था होणं गरजेचं असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
आपल्या नायक मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था व्हायला पाहिजे. आपण आतापासूनच ही सुरुवात केली तर या रोपट्याच भविष्यात मोठं जाळ पसरेल असं वक्तव्य ठाणे शहराचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं. नायक मराठा समाज सेवा संस्थेच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात केलं. आपल्या संस्थेला चार ते पाच वर्षात जर का मान्यता मिळाली तर आपल्या संस्थेचं नाव होईल. शिवाय संस्था उभी राहत असताना यामध्ये देणगी देणारे भरपूर असतात. यामधून महाड पोलादपूरमधील ग्रामीण भागातील मुलांना या सुविधांचा लाभ होण्यासाठी ही वाट मोकळी करण्यासाठी काम केलं पाहिजे. जो पुढे जात असेल त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे असेही म्हस्के म्हणाले.
आपलीच माणसे आपलं पाय ओढतात : मंत्री भरत गोगावले
माझ्या मतदार संघात 65 टक्के माझा समाज आहे. मला आमच्या मराठा समाजाने ठरवलं असतं तर त्याच मतांवर मी निवडून आलो असतो. परंतू, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आपल्याला शाप आहे. कारण आपलीच माणसे आपलं पाय ओढतात. ते केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही अस टोला त्यांनी नायक मराठा समाजाला लगावला. आम्ही कधीच काळजी किंवा घाबरून गेलो नाही. उलट माझी नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे. हे जर का असेल तर असे किती येतील आणि जातील याचा काहीच फरक पडत नसतो असा टोला त्यांनी उपस्थितांना लगावला. भरत गोगावले यांचा आज नायक मराठा समाजाकडून महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या कमी मताधिक्यावरुन हे वक्तव्य केलं.
























