देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. West Bengal Train Accident: पश्चिम बंगालच्या बांकुरात दोन मालगाड्यांची टक्कर; दुर्घटनेत इंजिनसोबत मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले


West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरामधील (Bankura) ओंडामध्ये मालगाड्यांची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत इंजिनसोबत मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. तर मालगाडीचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे आद्रा-खरगपूर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाचा सविस्तर 


2. Weather Update : उत्तर भारतात पावसाची जोरदार हजेरी, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; वाचा हवामान विभागाचा अंदाज


Weather Update : देशातील वातावरणात बदल (Climate change) होत आहे. काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. सध्या दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच मुंबईतही चांगला पाऊस पडत आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीसह मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. वाचा सविस्तर 


3. Sangli Politics: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा आज महाराष्ट्र दौरा; सांगलीत भव्य सत्कार, काँग्रेसचा महानिर्धार मेळावा आणि शक्तीप्रदर्शन


Maharashtra Sangli Politics: कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री (Karnataka CM) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांचा भव्य सत्कार आणि महानिर्धार मेळावा आज सांगलीमध्ये पार पडणार आहे. काँग्रेसच्या (Congress)  कर्नाटकमधील अभूतपूर्व विजयानंतर सिद्धरमय्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार आहेत. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सिद्धरमय्या यांचा महाराष्ट्रात हा पहिलाच सत्कार सोहळा असणार आहे, जो सांगलीमध्ये संपन्न होणार आहे. वाचा सविस्तर 


4. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय वारसा अन् संस्कृतीला जागतिक स्तरावर चालना मिळणार? सर्वेक्षणातून काय आलं समोर?


ABP C Voter Survey: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि अनेक कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशांच्या लोकांना संबोधित केलं. अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान मोदी शनिवारी (24 जून) इजिप्तला पोहोचले. दरम्यान, सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत सर्वेक्षण केलं आहे. वाचा सविस्तर 


5. एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यामागचा हेतू काय? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष


ABP C Voter Survey On PM Modi US Visit: टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिका दौऱ्यावर (21 जून) असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं. यावेळी मस्क यांनी भारताच्या पंतप्रधानांचे कौतुक केलं. तसेच, यावेळी भारतासाठी अनेक गोष्टी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी चाहता असल्याचंही मस्क यांनी म्हटलं. वाचा सविस्तर


6. PM Modi US Visit : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे भारताला फायदा, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, गुगल-ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांची घोषणा


PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अलिकडेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान मोदींचा हा दौरा सफल ठरल्याचं बोललं जात आहे. यामुळे येत्या काळात भारतात अब्जावधी डॉलर्सचा फायदा होणार आहे. गुगल आणि ॲमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी आगामी काळात भारतात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारतासाठी फार फायदेशीर ठरल्याचं मानलं जात आहे. यामुळे भारत-अमेरिका संबंध मजबूत झाले असून यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येणार आहे. वाचा सविस्तर 


7. Sarfaraz Khan: 80 ची सरासरी, 9 अर्धशतकं अन् 13 शतकं... तरीही सरफराजचं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सिलेक्शन का नाही?


Sarfaraz Khan: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही मालिकेत टीम इंडियाची (Team India) धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाला दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल. वाचा सविस्तर 


8. Kuljit Pal Passed Away : सिने-निर्माते कुलजीत पाल यांचे निधन; ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना सिनेमात दिलेला पहिला ब्रेक


Kuljit Pal : ज्येष्ठ सिने-निर्माते कुलजीत पाल (Kuljit Pal) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर 


9. Today In History : देशात आणीबाणी जाहीर, भारताने पहिल्या विश्वचषकावर नाव कोरले, इतिहासात आज


On this day in history june 25 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 25 जून रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 1975 मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली. पॉप जगताचा बादशाह मायकल जॅक्सन (Michael Jackson) याने आजच्याच दिवशी अर्थात 25 जून 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला होता.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर 


10. Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 25 June 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे गुंतवतील. कन्या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.  आजचा रविवार मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर