Kuljit Pal : ज्येष्ठ सिने-निर्माते कुलजीत पाल (Kuljit Pal) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 


कुलजीत पाल यांचा सिनेप्रवास... (Kuljit Pal Movies)


कुलजीत पाल हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने-निर्माते होते. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना कुलजीत पाल यांनीच सिनेमात पहिला ब्रेक दिला होता. पण काही कारणाने हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. कुलजीत पाल यांनी 'अर्थ', 'आज', 'परमात्मा', 'वासना', 'दो शिकारी' आणि 'आशियाना' सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. 


कुलजीत पाल यांच्या लेकीचे नाव अनु पाल (Anu Pal) आहे. 'आज' (Aaj) या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमात राजीव बाटियादेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमात त्यांनी मार्शल आर्ट ट्रेनरची भूमिका साकारली होती. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला. 


कुलजीत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. कुलजीत यांचा मॅनेजर संजय बाजपेयीने दिलेल्या माहितीनुसार, कुलजीत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. अखेर 24 जून 2023 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ निर्माते कुलजीत पाल यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीने एक महत्त्वाचा निर्माता गमावला आहे. 






अंत्यसंस्कार कधी होणार? 


मीडिया रिपोर्टनुसार, 25 जून 2023 रोजी कुलजीत पाल यांच्या पार्थिवावर मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित मंडळी अंत्यसंस्कारादरम्यान उपस्थित राहणार आहेत. तर 29 जून 2023 रोजी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Television News : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची हटके लव्हस्टोरी ते मांजरप्रेमी जुई गडकरीचं मांजर प्रेम; मराठी मालिका विश्वातील बातम्या वाचा एका क्लिकवर!