देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


 हिमाचल-उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट तर, दिल्ली-यूपीमध्ये मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज


 यंदा पावसाने (Rain) देशभरात पूरसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. पावसाने काही ठिकाणी नागरिकांना दिलासा दिला असला तरी काही ठिकाणी याच पावसाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच (17 ऑगस्ट रोजी) उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, या संपूर्ण आठवड्यात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
 (वाचा सविस्तर)


 फिरोज खान की फिरोज गांधी? देशातील पहिला घोटाळा उघडकीस आणणारे राहुल गांधींचे स्वातंत्र्यसैनिक आजोबा नेमके कोण होते? 


 अभिनेते शरद पोंक्षे यांनी मालेगावमधील एका सभेत राहुल गांधींचे पूर्वज हे गांधी नसून खान असल्याचा दावा केला होता. केवळ राजकारणासाठी त्यांनी गांधी हे आडनाव वापरून फायदा मिळवल्याचा दावाही त्यांनी केला होता. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या मते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे आजोबा आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पतींचे नाव (Indira Gandhi Husband) हे फिरोज गांधी नसून फिरोज खान होते.
(वाचा सविस्तर)


 RBI आजपासून करणार पायलट प्रोजेक्ट सुरु, कर्ज मिळणं सुलभ होणार; कृषी पतपुरवठ्यावर भर 


 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आजपासून सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अर्थात पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा (Public Tech Platform) पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) मा्ध्यमातून सहज कर्ज उपलब्ध करता येणार आहे. (वाचा सविस्तर)


 तुमच्याच प्रिय व्यक्तीच्या आवाजात बोलून बँक खाते करतील रिकामं, नवा स्कॅम समजून घ्या


सायबर गुन्हेगारीची वाढती संख्या पाहून देशभरात सायबर गुन्हेशाखा स्थापन करण्यात आल्या. पण सायबर गुन्हेगारी काही कमी झालेली दिसत नाही. सायबर गुन्हेगार प्रत्येकवेळी नवनवीन मार्ग शोधत आहेत. आता सायबर गुन्हेगारांनी आणखी एक  मार्ग शोधलाय. होय... सायबर गुन्हेगार सध्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत. एआय (artificial intelligence) चा वापर करुन व्हाईस क्लोनिंग केले जाते..  (वाचा सविस्तर)


चंद्राच्या कक्षेत पोहचलं रशियाचं लूना-25, भारताच्या दोन दिवस अगोदर उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर


 भारताची चांद्रयान - 3 मोहीम (Chandrayaan 3) अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान मोहिमेसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे.  आज चांद्रयान -3 चं प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळं होणार आहे. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान -3 उतरणार आहे. तर दुसरीकडे रशियानेही सोडलेले 'लुना-25' बुधवारी दुपारी 2.27 वाजता चंद्राच्या 100 किमी कक्षेत पोहचले आहे.  (वाचा सविस्तर)


 राहुल गांधी लडाख दौऱ्यावर जाण्याची शक्यता, कारगिल हिल परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा


 काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी लडाखच्या (Ladakh) दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून एएनआयला देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे गुरुवार आणि शुक्रवार लडाखच्या दौऱ्यावर असणार आहेत. याआधी राहुल गांधी यांनी दोन वेळा जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला आहे.  (वाचा सविस्तर)


 मिथुन, सिंह, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य 


आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज, ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल, कर्क राशीच्या लोकांचे काही कारणास्तव जास्त पैसे खर्च होऊ शकतात. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)


17th August In History: स्वराज्याच्या इतिहासातील थरारक घटना; आग्र्याहून औरंगजेबाच्या नजरकैदेतून शिवाजी महाराज निसटले; आज इतिहासात


स्वराज्याच्या इतिहासातील एक थरारक घटना आजच्या दिवशी झाली. शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याच्या हातावर तुरी देत नजरकैदेतून निसटले. तर, क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा हुतात्मा दिनही आज आहे. (वाचा सविस्तर)