IMD Weather Update : यंदा पावसाने (Rain) देशभरात पूरसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. पावसाने काही ठिकाणी नागरिकांना दिलासा दिला असला तरी काही ठिकाणी याच पावसाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच (17 ऑगस्ट रोजी) उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, या संपूर्ण आठवड्यात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.


आज (17 ऑगस्ट) राजधानीत दिल्लीत हलका पाऊस अपेक्षित आहे. तर, शुक्रवारी (18 ऑगस्ट) हवामान चांगले राहील. याशिवाय, दिल्लीतलं आज कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या (IMD) म्हणण्यानुसार, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी दिल्लीत पाऊस पडल्यानंतर तापमान वाढण्याची शक्यता आहे.






छत्तीसगडमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात


छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झालेल्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, हवामान विभागानुसार येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही दोन दिवसांच्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी 18 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात हलक्या रिमझिम पावसाचा अंदाज आहे. या काळात कधी ऊन तर कधी पावसाचं चिन्ह दिसेल. त्यामुळे नागरिकांना आता कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे.


हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी


हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यांतील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दोन्ही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आज (17 ऑगस्ट) राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागानुसार राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. याशिवाय बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Vishwakarma Yojana : विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात 18 पारंपरिक उद्योगांचा समावेश, 13 हजार कोटींचा खर्च अपेक्षित