RBI Pilot Project: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आजपासून सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अर्थात पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा (Public Tech Platform) पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) मा्ध्यमातून सहज कर्ज उपलब्ध करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी याबाबतची माहिती दिली.  यामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी पतपुरवठ्यावर भर असणार आहे. 


रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर पायलट प्रकल्पादरम्यान 1.6 लाख रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दूध उत्पादकांना कर्ज, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कोणत्याही प्रकारचे तारण न देता कर्ज देता येणार आहे. वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्ज देखील या माध्यमातून देता येणार आहे. 
या प्लॅटफॉर्मद्वारे इलेक्ट्रॉनिक केवायसी, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅनची वैधता, आधार ई-स्वाक्षरी आणि घर आणि मालमत्ता शोधण्याचे काम करता येणार आहे.  दरम्यान, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज वितरण सुलभ करायचे आहे. यासाठी आरबीआय आज (17 ऑगस्ट) रोजी प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुरु करणार आहे.


दरम्यान, या प्लॅटफॉर्मवर, ओपन अॅप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस (एपीआय) आणि उद्योग मानकांद्वारे अशा लोकांना कर्ज दिले जाऊ शकते ज्यांना कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार आज ( 17 ऑगस्ट) हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक तत्त्वावर लॉन्च केला जाईल. या कालावधीत मिळालेल्या अनुभवाच्या आधारे, अधिक उत्पादने, माहिती प्रदाते आणि कर्जदारांना देखील या कक्षेत आणले जाणार आहे. पब्लिक टेक प्लॅटफॉर्म आधारच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक केवायसी, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅनची वैधता, आधार ई-स्वाक्षरी आणि घर आणि मालमत्ता शोधण्याचे काम करता येणार आहे.


कर्ज सहज उपलब्ध करण्यासाठी पब्लिक टेक प्लेटफॉर्म


पब्लिक टेक प्लेटफॉर्ममुळे आरबीआयला बॅंका उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कर्ज देता येणे सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणाचा वित्तीय समावेशन वाढवण्यासाठी उपयोग करता येणार आहे. याबाबत अधिकची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबतर्फे (RBIH) कर्ज सहज उपलब्ध करण्यासाठी हा सार्वजनिक तंत्रज्ञान मंच तयार केला जात असल्याचे दास म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Banks Loan Write-Off: मागील 10 वर्षात बँकांनी केले 15.31 लाख कोटींचे कर्ज राईट ऑफ; RBI ने दिली माहिती