Forest Fire : जंगलातील वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ; सर्वाधिक वणव्यांची नोंद गडचिरोलीत
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 10,577 वणवे लागले. ग्नितांडव झालेल्या टॉप 10 राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याचा क्रमांक लागतो. 34,025 वणव्यांसह महाराष्ट्र 4 क्रमांकावर आहे.
Nagpur News : गेल्या काही वर्षात जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ झाल्याचे एसएनपीपीच्या आकडेवारीतून (SNPP) दिसून येत आहे. गतवर्षी देशभरात जंगलामध्ये अग्निकांडाच्या 3 लाख 45 हजार 989 घटना नोंदविण्यात आल्या. जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक वणव्यांची नोंद राज्यात गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे.
वणव्यांमध्ये अडीच पट वाढ
मुख्यत: देशातील एकूण वनक्षेत्रापैकी 11.66 टक्के क्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण मानले जाते. यामध्ये मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, मणीपूर या पूर्वेात्तर राज्यांसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, मध्य ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील काही भागांचा समावेश आहे. वणव्यांचा अलर्ट मोडिस प्रणालीद्वारे नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या काळात 52 हजार 785 वणव्यांच्या नोंदी झाल्या तर एसएनपीपीद्वारे (SNPP) 3 लाख 45 हजार 989 वणवे नोंदविण्यात आले. 2020-21 साली मात्र यामध्ये अडीच पट वाढ झाली.
धक्कादायक आकडेवारी
ओडिशामध्ये सर्वाधिक 51 हजार 968 वणवे नोंदविले गेले पण धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 10,577 वणवे लागले. जंगलात अग्नितांडव झालेल्या टॉप 10 राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याचा क्रमांक लागतो. 34 हजार 025 वणव्यांसह महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातही अनेकवेळा आग
नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातही जवळपास प्रत्येक उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून परिसराला भिंतीचे कुंपण तयार करण्यात आल्याने या घटनांमध्ये घट झाली आहे. शिवाय यंदा दिवळीतही या परिसरात कुठलीही आगीची घटना घडली नाही हे विशेष. या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरडे लाकूड आणि झुडपे आहेत. यापूर्वी अनेकवेळा घडलेल्या आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती.
महत्त्वाची बातमी