राज्यभर पावसामुळे दहा जणांचा मृत्यू
पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी झालेल्या घटनांमध्ये एकूण दहा जणांना मृत्यू झाला आहे. मुंबईत शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला, तर काहींचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी झालेल्या विविध घटनांमध्ये एकूण दहा जणांना मृत्यू झाला आहे.
मुंबई वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अंधेरीतील अण्णानगर आरटीओ ऑफिससमोर शॉक लागून काशीमा युडियार या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तर गोरेगावमध्ये राजेंद्र यादव (60) आणि संजय यादव (24) यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये वीज अंगावर पडून आई आणि मुलाचा अंत झाला आहे. उमरी तालुक्यातील हातनी येथे संध्याकाळी शेतात काम करताना सुशीला सुरने (30) आणि राजेश सुरने (4) यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
भिवंडी शहरात एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात जमा असलेल्या पाण्यात खेळताना दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. अरमान नसरुद्दीन मंसुरी असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
अकोला येथील बाळापूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. बोरवाकळी येथे शेतात काम करणाऱ्या बाळु नारायण उमाळे (55) आणि दीपक शेगोकार (15) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
वाशिम येथील कारंजा तालुक्यातील इंझोरी परिसरातील घोटी शेत शिवारात संध्याकाळी वीज पडल्याने 28 वर्षीय मेंढपाल पिंटू शिंदेचा जागीच मूत्यू झाला. तर नागपुरात भिवापूर तालुक्यात वीज कोसळून विठोबा चौधरी (45) या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या