एक्स्प्लोर
Advertisement
मान्सून राज्यात दाखल, पुढच्या 24 तासात मुंबईत येणार!
मान्सून आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा- विदर्भातील काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
मुंबई : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा- विदर्भातील काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
येत्या 24 तासात मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात जाण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे.
या काळात कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्राचा जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापेल, अशी आशा आहे.
राज्यभरात मुसळधार मान्सून पर्व पाऊस
आगामी काळात मान्सून कसा असेल, याची झलक मान्सून पूर्व पावसानेच दाखवून दिली आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या आठ दिवसांपासून तुफान मान्सून पूर्व पाऊस झाला. या पावसामध्येच अनेक नद्यांना पूर आला आहे, तर शेतकऱ्यांनी केलेल्या जलसंवर्धनाच्या कामाचाही मोठा फायदा झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement