एक्स्प्लोर
पत्नीला अश्लील मेसेज, पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा
पिंपरीत राहणाऱ्यासंबंधित पती-पत्नीमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून तणाव आहे. त्यातच पतीकडून वारंवार अश्लील मेसेज येत असल्याने पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली

पिंपरी चिंचवड : पतीने अश्लील मेसेज पाठवले, म्हणून पत्नीनेच पोलिसात धाव घेतली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने आपल्या 38 वर्षीय पतीविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पिंपरीच्या कामगारनगरमध्ये राहणारा पती पत्नीला वारंवार अश्लील मेसेज करायचा. मात्र हा उपद्व्याप त्याला चांगलाच महागात पडला आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून संबंधित पती-पत्नीमध्ये तणाव आहे. अनेकवेळा दोघांमध्ये खटकेही उडाले आहेत. दोन मुलं असतानाही अखेर दोघं वेगवेगळे राहू लागले. गेल्या काही महिन्यांपासून पतीने तक्रारदार पत्नीला अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं, पण मेसेजचा अतिरेक वाढू लागला आणि यालाच वैतागून पत्नीने पोलिसात धाव घेतली.
आणखी वाचा























