कोव्हिडं काळात सरकाने केवळ ओरबाडण्याचं काम केलं : संदीप देशपांडे
जंबो कोव्हिडं सेंटरचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं परंतु त्याचा उपयोग काय. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत. अशा शब्दात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली.
मुंबई : महाराष्ट्र सरकाने केवळ कोव्हिड काळात ओरबाडण्याचं काम केलं. पत्रकार पांडुरंग रायकर हे एक उदाहरण आहेत. अशा पद्दतीची अनेक उदाहरण सध्या राज्यात पाहिला मिळत आहेत. यामध्ये अँब्युलन्स मिळाली नाही, रूग्णालयात बेड नाही मिळाला. अगदी हॉस्पिटलच्या दारात माणसं बसली आहेत आणि त्यांचं डायलिसिस होतं नाही आणि त्यामुळे लोकांचे मृत्यू झाले असे धक्कादायक प्रकार देखील समोर यायला लागले आहेत. यावरून एक बाब स्पष्ट होते की, या सरकाने कोव्हिडच्या नावावर केवळ पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे. प्रत्यक्षात रुग्णांना उपचार मिळालेले नाहीत. जंबो कोव्हिडं सेंटरचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं परंतु त्याचा उपयोग काय. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत. अशा शब्दात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली.
देशपांडे म्हणाले, जर राज्यात पत्रकारांचे हे हाल आहेत तर मग सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होतं असतील असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. यानंतर विदर्भातील पूर परिस्थिती बाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, अशी परिस्थिती विदर्भावर निर्माण होणे हे राज्य सरकारचं अपयश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर वचक नाही. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये कोणता अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्याची त्यांना हव्या असणाऱ्या विभागात बदली करून घेणे यात मुखमंत्री उद्धव ठाकरे व्यस्थ आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे हे घरात बसून कळणार नाही. यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. लोकांमध्ये गेल्याशिवाय प्रश्न समजत नाहीत. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधी कळणार आहे. सध्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना कसं जीवन जगायचं हा प्रश पडला आहे. या सगळयांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करत आहेत. ते कधी बाहेर पडणार आहेत. कधी सर्वसामान्यांना दिलासा देणार आहेत. प्रत्यक्ष काय घडतंय हे केवळ विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नाही कळत त्यासाठी प्रत्येक्षात जावं लागतं हे त्यांना कधी कळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेतील प्रश उत्तराचे तास रद्द केले. महापालिकेचे सभागृह घेतं नाहीत का तर त्याची चर्चाच होईला नको. आंदोलनं केली तर लगेचच अटक होते. म्हणजे आम्ही सरकारला जाब विचारायचाच नाही का?. यावरून एक बाब लक्षात येतं आहे ती म्हणजे राज्यात सध्या केवळ हुकूमशाही सुरू आहे, असेही देशपांडे म्हणाले.
संबंधित बातम्या :