Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे पाऊल
MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वीच धमकीचं पत्र आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कृती केली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था तीच आहे पण त्यातील पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचच ( Y +) आहे. मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा धमकीचे पत्र पत्र आले आहे. या प्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंची पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता राज्य सरकारच्या वतीनं राज ठाकरे यांच्या सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांना जीवे मारण्याचं पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली, तसेच भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.
उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा..
राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) म्हटलं होतं. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली होती.