Raj Thackeray Uttarsabha Live Updates : राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे
MNS Raj Thackeray Live : राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहेत. आजच्या उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
LIVE
Background
MNS Raj Thackeray live Thane, Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तरसभा आहे. गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेल्या भाषणाचे पडसाद अद्यापही कायम असताना उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड इथे राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. रात्री साडेसातच्या सुमारास राज ठाकरे बोलायला सुरुवात करतील.
खरंतर राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही 9 एप्रिल रोजी होणार होती. परंतु तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता 12 तारखेला म्हणजेच आज होणार आहे. दरम्यान या उत्तरसभेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 200 बाईक्स असतील. तसंच मनसैनिक 60×40 फुटांचा हनुमानाचा झेंडा पालघरवरुन आणणार आहेत. तर नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सभेसाठी ठाण्यात येणार आहेत.
अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांचं ट्वीट
मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी देखील राज ठाकरेंच्या उत्तरसभेबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "उत्तरसभा म्हणजे हिशेबाचा दिवस, आज राजसाहेब करारा जवाब देणार, आज ठाण्यात राजगर्जना घुमणार आणि भ्रष्टवादी महाखिचडीची तंतरणार, चलो ठाणे."
तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील ट्वीट करुन उत्तरसभेसंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात राज ठाकरे यांची वाक्ये ऐकू येतात. ती अशी की, "वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे."
उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार?
या उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात मशिदींवरील भोंग, मदरशांमधील गैरप्रकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवाय त्या भाषणात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे.आता या उत्तरसभेत राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार हे पाहावं लागेल.
Palghar News Update : पालघरधील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील मजुरांवर रानडुक्कराचा हल्ला; पाच जण जखमी
Palghar News Update : पालघरधील वाडा तालुक्यातील सोनाळे बुद्रुक येथील नंबरपाडा येथील रहिवासी असलेले मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असताना त्यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला आहे. यात पाच मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाडा तालुक्यातील सोनाळे बुद्रुक येथील बाळू रायात (वय 42 ) हे सकाळी कामावर निघाले असताना त्यांच्यावर रानडुक्कराणे हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत, तर दुपारी घरी जात असताना रोहिदास रायात, काशीनाथ रायात, वनिता रायात, अनंता पवार यांच्यावरही रानडुक्कराने हल्ला केला. यात अनंता पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.
Raj Thackeray on Sharad Pawar : राज ठाकरे नाही तर शरद पवारांनी भूमिका बदलली : राज ठाकरे
Raj Thackeray on Sharad Pawar : देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती. त्यानंतर हा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. निवडणुकानंतर पुन्हा दोन महिन्याात भूमीका बदलली आणि कृषीमंत्री झाले. राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली
Raj Thackeray Uttarsabha Live Updates : राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे
Raj Thackeray Live : मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही : राज ठाकरे
Raj Thackeray Live : मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं : राज ठाकरे
Raj Thackeray Live : मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं : राज ठाकरे
Raj Thackeray Uttar Sabha : जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले : राज ठाकरे
Raj Thackeray Uttar Sabha : भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं. दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले