एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये मनसेकडून 'टिकटॉक' स्पर्धेचे आयोजन
मनसेच्या चित्रपट सेनेच्या मराठवाडा विभागातर्फे टिकटॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील तरुणांमध्ये असलेल्या कला-गुणांना आणि टिकटॉकवर असलेल्या कलाकारांच्या कलेला वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
औरंगाबाद : तरुणांमध्ये सध्या टिकटॉक या मोबाईल अॅपची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. हेच लक्षात घेऊन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिकटॉक व्हिडिओची. या स्पर्धेतून 'टिकटॉक किंग' आणि 'टिकटॉक क्वीन'ची निवड करण्यात येणार आहे.
भारतात टिकटॉक अॅपची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. लहान-मोठ्या शहरातील अनेक तरुण-तरुणी या टिकटॉक अॅपवर आपले व्हिडीओ बनवुन पोस्ट करत असतात. त्यामुळे मनसेच्या चित्रपट सेनेच्या मराठवाडा विभागातर्फे टिकटॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील तरुणांमध्ये असलेल्या कला-गुणांना आणि टिकटॉकवर असलेल्या कलाकारांच्या कलेला वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या स्पर्धेअंतर्गत 'येरे येरे पावसा 2' या चित्रपटातील 'अश्विनी ये ना...' या गाण्यावर 15 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हाटॅसअॅपवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील तरुणांमध्ये अनेक कला-गुण असताना केवळ संधी नसल्यामुळे त्यांना पुणे-मुंबईतील तरुणांप्रमाणे पुढे जाता येत नाही. त्यांना योग्य संधी देऊन पुढील वाटचालीची दिशा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे. या संघटनेचे जिल्हा संघटक कौस्तुभ भाले यांना सुचलेल्या कल्पनेला मराठवाडा संघटक आशिष सुरडकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा केवळ मराठवाड्यातल्या तरुणांसाठी आहे.
4 टप्प्यात असेल स्पर्धा, 9 ऑगस्टपर्यंत पाठवा व्हिडिओ
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात तरुणांना 'अश्विनी ये ना...' या गाण्यावर 15 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हाॅटसअपवर पाठवायचा आहे. 9 ऑगस्ट पर्यंत हा व्हिडिओ पाठवावा लागणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा चार टप्प्यात ही स्पर्धा राबवली जाणार आहे. यात पहिल्या महिन्यात व्हिडीओसाठी गाण्याची निवड करण्यात आली असून त्या पुढील महिन्यात चित्रपटातील डायलॉग आणि त्यानंतर स्वत: डायलॉग लिहिणे असे टास्क देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी दर महिन्याला 10 स्पर्धकांची निवड करण्यात येईल. डिसेंबरमध्ये त्यांच्यातून अंतिम विजेता घोषित करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मनसे कडून 75889 77315 हा क्रमांक देण्यात आला आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement