एक्स्प्लोर
अखेर प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित!
मुंबई: सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं अखेर निलंबन झालं आहे. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा, सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली.
परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील.
दरम्यान समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनापर्यंत मांडण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी केली आहे.
चौकशी समिती
अध्यक्ष - सभापती रामराजे निंबाळकर
सदस्य - चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, जयंत पाटील,कपिल पाटील, शरद रणपीसे, आमदार नीलम गोऱ्हे
परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्याबाबत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदन दिलं.
"परिचारकांचं वक्तव्य निंदाजनक, संतापजनक आहे. असं वक्तव्य केल्यामुळे समाजातून संताप व्यक्त करण्यात येतोय. असं वक्तव्य विधानपरिषदेच्या सदस्याला न शोभणारं आहे. सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे वक्तव्य असल्यामुळे त्याची चौकशी करुन परिचारक यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहीजे. यासाठी समिती गठित करुन शिक्षेच्या पुढील शिफारशी करण्यात येतील.
1) विशेषाधिकार भंग,
2) कारावासाची शिक्षा,
3) निलंबन करणे
4) सदस्यत्व कायमचे रद्द करणे
चौकशी पूर्ण करून लवकरात- लवकर चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
याशिवाय "परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर हे या समितीचेअध्यक्ष असतील. तर या समितीमध्ये चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस आमदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, 'लोकभारती'चे आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे हे सदस्य असतील", असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
पुढच्या दीड वर्षांसाठी प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्यात आल्याचंही पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या :
..तोपर्यंत परिचारकांना निलंबित करु : चंद्रकांत पाटीलपरिचारकांचं निलंबन करा, विधानपरिषदेत सर्वपक्षीयांची मागणी
सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली ‘ते’ वक्तव्य अनवधानानं निघालं’, परिचारकांचा माफीनामा आमदार प्रशांत परिचारकांना महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेशअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement