Satyajeet Tambe : जनता किती सहनशील, मुंबई परिसरात पायाभूत सुविधांचा बोजवारा; सत्यजीत तांबेंनी सांगितला अनुभव
Satyajeet Tambe : ट्रफिकच्या संदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी स्वत:चा एक अनुभव शेअर केला आहे.
Satyajeet Tambe : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. यामुळं काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईसह ठाणे कल्याण परिसरातही नागरिकांना ट्रॅफिकमुळं मोठा त्रास होत आहे. या ट्रफिकच्या संदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी स्वत:चा एक अनुभव शेअर केला आहे. जनता किती सहनशील आहे. मुंबई परिसरात पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडाल्याचे तांबेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले सत्यजीत तांबे?
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो होतो. नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडी येथे तीन ते चार तास ट्रॅफिकमध्ये अडकलो. शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील. मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला. तिथेही 30 मिनिटांच्या प्रवासाला तीन तास लागले. अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालो. खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघरपासून पनवेलपर्यंत तर कल्याण-डोंबिवलीपासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढला आहे. किती सहनशील जनता आहे असं सत्यजीत तांबेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडाला आहे. माणसाची जीवनशैलीची ऐशी की तैशी झाली आहे. पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नसल्याचे तांबेंनी म्हटलंय.
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३०… pic.twitter.com/hWyvmMbDFY
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 24, 2023
मुंबईसह ठाणे भिवंडी, पालघर, पनवेल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसतंय. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होताना दिसत आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दोन-दोन तीन-तीन तास ट्रॅफिक जाम होत आहे. याच ट्रॅफिकच्या सामना आमदार सत्यजीत तांबेंना देखील करावा लागला आहे. याबाबतचा त्यांनी अनुभव सांगितला आहे. सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हा अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: