एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चोरट्यांचा दोन आमदारांना फटका, कल्याण स्टेशनला राहुल बोंद्रे आणि संजय रायमूलकरांना लुटलं
चोरट्यांनी आमदार राहुल बोंद्रे आणि संजय रायमूलकरांना लुटलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण स्टेशनला आमदार बोंद्रेंच्या पत्नीची पर्स पळवली तर प्रवासात संजय रायमूलकरांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजारांची रोकड लंपास केली.
बुलडाणा : पावसाळी अधिवेशन चालू असताना राज्यातील दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांचा फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांच्या साहित्याची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. हा संपूर्ण प्रकार कल्याण रेल्वे स्टेशनला घडला असून आमदारांनी सीएसएमटीच्या लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा सगळा प्रकार आमदारांसाठी रेल्वेमध्ये लागलेल्या विशेष बोगीमध्ये झाल्याचं समोर आलं आहे.
पावसाळी अधिवेशन चालू असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे, शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे मुंबईला सोमवारी सकाळी पोहचले. आमदार बोन्द्रे आपल्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासोबत रविवारी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले होते. तर शिवसेनेचे आमदार आमदार रायमूलकर आणि खेडेकर हे जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला पोहचले.
सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान आमदार बोन्द्रे जेव्हा कल्याण स्टेशनला उतरणार त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या पत्नी वृषाली जवळील पर्स हिसकावून पळवून लावली. तसेच बोन्द्रे यांच्या जवळील महत्वाच्या कागदपत्रांची फाईल ही पळविली. बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करुन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटा पळ काढला यशस्वी झाला. बोन्द्रे यांच्या पत्नीच्या पर्समध्ये 26 हजारांची रोकड, एटीम कार्डसह इतरही साहित्य चोरीला गेलं.
दुसरीकडे जालना वरुन देवगिरी एक्स्प्रेसने जाणाऱ्या आमदार रायमूलकर यांनी कल्याण स्टेशनला उतरायचे होते. उतरण्यासाठी रायमूलकर सकाळी उठले असता त्यांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या लक्ष्यात आलं. तर सोबत असलेले आमदार खेडेकर यांची बॅग समजून चोरट्याने त्यांच्या बॅगेला ब्लेडने कापले असल्याचं समोर आलं. हा संपूर्ण प्रकार कल्याण ते ठाणे स्टेशन दरम्यान घडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement