Nitin Deshmukh on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा; थेट मागणीने भूवया उंचावल्या!
Nitin Deshmukh on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा असल्याचे आमदार नितीन देशमुख म्हणाले.
Nitin Deshmukh on Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला असतानाच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अजूनही दावे प्रतिदावे सुरु आहेत. महायुतीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याची चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीमध्येही मुख्यमंत्री पदावरून हेवेदावे केले जात आहेत. विशेष करून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून एकमेकांवर कुरघोडी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी (Nitin Deshmukh on Uddhav Thackeray) जाहीरपणे उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा असल्याचे आमदार नितीन देशमुख म्हणाले. नितीन देशमुख यांनी सांगितले की, शिवसेनेच्या धनुष्यबाण चोरणारे भाजप आणि शिंदे हे रावण आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. शिवसेना सोबत असल्यानेच काँग्रेस एका खासदारांवरून 13 खासदारांवर गेली आणि भाजप 23 खासदारांवरुन 9 खासदारांवर आल्याचे ते म्हणाले.
तर राजकारणात राहणार नाही
दरम्यान नितीन देशमुख यांनी शिंदे गटाला सुद्धा जाहीर इशारा दिला. शिंदे गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं नाही तर राजकारणात राहणार नाही़, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. शिंदेचा आमदार बुरखे वाटतो तेव्हा हिंदुत्व सोडलं असं का म्हणत नाही? अशी सुद्धा त्यांनी विचारणा केली. वंचित बहुजन आघाडीला सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना टोला लगावला. ठाकरेंच्या शिवसेनेला हरवण्यासाठीच भाजप वंचितला मदत करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. मला हरवण्यासाठी रणनीती नव्हे तर कट रचनेत येणार असल्याचा आरोप सुद्धा नितीन देशमुख यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या