एक्स्प्लोर
...तर ’प्रसाद’ दिल्याशिवाय पाठवणार नाही : नितेश राणे
“नाणारसाठी कुठल्याही समितीने आमच्या देवगड विजयदुर्ग येथे पाऊल टाकले, तर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही."
मुंबई : रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पग्रस्तांना समजावण्यासाठी बनवण्यात आलेली मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास त्यांना ‘प्रसाद’ देऊ, असा इशार आमदार नितेश राणे यांनी दिलाय.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
“नाणारसाठी कुठल्याही समितीने आमच्या देवगड विजयदुर्ग येथे पाऊल टाकले, तर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही. आम्हाला चर्च नको, नाणार रद्दच करा, असे जनतेने सांगितले आहे. मग ही समिती कुठलं भजन करायला येणार आहे? आणि ही समिती आलीच, तर मग ‘प्रसाद’ दिल्याशिवाय परत पाठवणार नाही.”, असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय.
नाणार प्रकल्पासाठी सरकारकडून एक समिती बनवण्यात आलीय. माजी सचिव सुखथनकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती लोकांचं मतपरिवर्तन करणार आहे. नाणार प्रकल्पाचं महत्त्व समजावून सांगण्याचं काम ही समिती करणार आहे. ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे? नाणार प्रकल्प ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला. काय आहे नाणार प्रकल्प?नाणार साठी कुठलीही समिती ने आमच्या देवगड विजयदुर्ग इथे पाऊल टाकले.. मग जे काय घडेल त्याची जवाबदारी आमची नाही!!! जेव्हा जनतेने परत-परत सांगितले आहे..आम्हाला चर्चा नको..नाणार रद्दच करा मग ही समिती कुठलं भजन करायला येणार आहे! आणि आलीच तर मग 'प्रसाद' दिल्या शिवाय परत पाठवणार नाही!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 25, 2018
- खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे
- जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय
- ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे.
- प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल
- या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार
- रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे.
- जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प
- जवळपास 90 लाख कोटी रुपयांची योजना
- वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता
- पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी
- दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement