एक्स्प्लोर

Bacchu Kadu : टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये; आमदार बच्चू कडू यांचा जरांगे पाटील यांना सल्ला 

Bacchu Kadu : मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा बदलवत टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

Bacchu Kadu on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  मराठा आरक्षणाच्या  (Maratha Reservation) मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एकेरी उल्लेख करत आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून उपोषण थांबवत तडक आता मुंबईतील फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची दिशा बदलवत टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला दिला आहे. जरांगे पाटील यांनी प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणे ही लढाई सुरू केली. याला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं, यासाठी एक शक्ति काम करत आहे. त्याला जरांगे पाटील यांनी बळी पडू नये एवढी आमची अपेक्षा असल्याचे देखील ते म्हणाले.

 टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बादलू नये

मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनातून प्रचंड मोठी उंची तयार केली आहे. ते आता केवळ एका गावापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांच्या मागे करोडो लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी अचानक असे हतबल होऊन उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे निघावं आणि अशी अतिशय टोकाची भूमिका घ्यावी, हे चुकीचे असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले. त्यांनी घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा. हा निर्णय समाजासाठी देखील चांगला नाही. शिवाय त्यातून चुकीचा संदेश समाजात जाईल. त्यांनी आतापर्यंत या प्रामाणिकपणे आंदोलनाच्या माध्यमातून जे मिळवलं, त्याला कुठे डाग लागता कामा नये. त्यामुळे माझा त्यांना सल्ला राहील की त्यांनी या पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊ नये. असे देखील बच्चू कडू म्हणाले.   

.... तर तो त्याचे परिणाम भोगेल

मनोज जरांगे पाटील असू देत किंवा देवेंद्र फडणवीस असू दे, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. आपण कुणाचाही जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही. मला असं वाटतं, या आंदोलनातून काय चांगला मार्ग काढता येईल, त्यासाठी शक्य ते प्रयत्न आपण करू. मात्र जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलू नये, असे देखील बच्चू कडू म्हणाले. जरांगे पाटील यांच्यावर सलाईन मधून विषबाधा करत घातपाताचा डाव आखण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यावर बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, मला व्यक्तिगत तरी असे कोणी केले असेल असे वाटत नाही. मात्र असं जर कोणी केले असल्यास तो त्याचे परिणाम भोगेल. असे देखील बच्चू कडू म्हणाले.

अजय बारस्कर आणि प्रहारचा संबंध संपला आहे. मात्र बारस्कर यांना देखील माझे आवाहन राहील की, व्यक्तिगत आयुष्यातील वक्तव्य करून हे आंदोलन कुठेतरी चिघळेल, असे वक्तव्य त्यांनी करू नये. एखादी आंदोलक हा आंदोलन करत असतो त्यावेळी त्याच्या भावना या तीव्र असतात. त्यावेळी जर का कोणी जाणूनबुजून त्यांना डीवचण्याच्या प्रयत्न करत असेल तर त्यांनी तो प्रयत्न थांबवला पाहिजे. अशी मी त्यांना देखील  विनंती करतो. असे देखील बच्चू कडू म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget