एक्स्प्लोर

तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर

शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

औरंगाबाद: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाकडे दिली. शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज हा निर्णय दिला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द या निर्णयाबाबत त्यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली. अर्जुन खोतकर म्हणाले, “तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू. 27 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे होते. मात्र शेवटच्या दिवशी जो-जो रांगेत असेल, त्या त्या सर्वांचे अर्ज भरुन घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच तांत्रिक मुद्दा पाहून खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला मी सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, तिथे मला दाद मिळेल”, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता. त्याबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने खोतकर यांची आमदारकी रद्द केली. दरम्यान या निर्णयावर दाद मागण्यासाठी अर्जुन खोतकर यांना कोर्टानं 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत आमदारकी रद्द करण्याचा निर्णय स्थगित असेल. कोण आहेत अर्जुन खोतकर?
  • अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.
  • 1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
  • सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत.
  • आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात. शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या वक्तृत्त्वशैलीतून ठळकपणे दिसून येते.
संबंधित बातम्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget