(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना परिवारात मोठी पोकळी, मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक, शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या सूचना
MLA Anil Babar Passed Away : अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
MLA Anil Babar Passed Away : मुंबई : आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये (Khanapur Vidhan Sabha constituency) त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.
सांगली येथील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्याच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण शिवसेना परिवार बाबर कुटुंबियांसोबत आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांनीही अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खानापूर-आटपाटीला जाणार आहेत.
विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द… pic.twitter.com/v6vQn4RW2g
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2024
विधानसभा सभागृहातील माझे सहकारी, सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 31, 2024
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आणि 'पाणीदार… pic.twitter.com/1vCrW74UKw
सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
— सुनील विश्वनाथ देवधर (@Sunil_DeodharMH) January 31, 2024
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना व कार्यकर्त्यांना मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
ॐ शांती! pic.twitter.com/3eO7odwLcS
शिवसेनेचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. माझी भावपूर्ण श्रद्धांजली !!
— Manoj Kotak (@manoj_kotak) January 31, 2024
ओम शांती 🙏 pic.twitter.com/PZHiiYMV99
शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच ते चार वेळा आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. रोखठोक भूमिका मांडणे… pic.twitter.com/oJeraOkJRU
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) January 31, 2024
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आ. बाबर यांना #श्रद्धांजली वाहिली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 31, 2024
आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात… pic.twitter.com/j5DTtWdjAv
आणखी वाचा :