एक्स्प्लोर
मॅजिक पेनचा वाळू ठेकेदारांकडून गैरवापर, सरकारला लाखोंचा चुना

नंदुरबार : वाळू वाहतूक रॉयल्टी पावतीवर मॅजिक पेनचा उपयोग करुन वाळू ठेकेदारांकडून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील कौठळ वाळू ठिय्यावर हा प्रकार सर्रास रित्या सुरु असुन प्रशासन मात्र या सर्व प्रकराकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करत आहे. शाई गायब होते! मॅजिक पेनच्या शाईला पावतीच्या खालच्या बाजुने थोडी उष्णता दिल्यास शाई नष्ट होऊन वाळू वाहतुकीची पावती पुन्हा ठेकेदारांकडुन वापरात आणली जाते. 'अशी' फसवणूक केली जाते! मॅजिक पेनचा वापर करण्यात आलेल्या पावत्या नंदुरबारचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कौठळ वाळू ठिय्यावरुन वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांकडून ताब्यात घेतल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या पावत्याच डुप्लिकेट असून या पावत्यांना उष्णता दिल्यास, त्यावरची शाईच गायब होत असल्याने या प्रकारातून वाळू ठेकेदारांकडून शासनाची फसवणूक केली जात आहे. महसूल प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न विशेष म्हणजे या प्रकरणानंतर महसूल प्रशासनाने संबधित ठेकेदाराची चौकशी करत या प्रकरणात गुन्हा दाखल करणे गरजेचे असतांना ठेकेदारांशी हितसंबंध जोपासत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तीन वर्षांपूर्वी ओमप्रकाश बकोरीया नंदुरबार जिल्हाधिकारी असतांना अशाच प्रकारे मॅजीकपेण वापराचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करत वाळू ठिय्या सील करण्यात आला होता. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्यानेच संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप खुद्द भाजपा पदाधिकारी करत आहेत. कारवाई होणार? प्रशासनातील कोणतेच वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाबद्दल कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच प्रशासनाच्या काही अधिकऱ्यांच्या जीवावर हा सर्व प्रकार सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शासनाला लाखो रुपयाचा चुना लावणाऱ्या बनावट पावत्या बनवणाऱ्या आणि उपोयोगात आणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करताना चालढकल करणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होणे आवश्यक आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























