खासदार नवनीत राणा म्हणजे 'जिधर बम, उधर हम' : मंत्री यशोमती ठाकूर
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात आता सामना रंगला आहे. नवनीत राणा यांचा स्वभावच आधीपासूनच 'जिधर बम, उधर हम' असा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
![खासदार नवनीत राणा म्हणजे 'जिधर बम, उधर हम' : मंत्री यशोमती ठाकूर Minister Yashomati Thakur Allegation on MP Navneet Kaur Rana Amravati Corona खासदार नवनीत राणा म्हणजे 'जिधर बम, उधर हम' : मंत्री यशोमती ठाकूर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27131948/yashomati-navneet-rana.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात आता सामना रंगला आहे. खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच लोकसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले होते. यावर महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी खास एबीपी माझाशी बोलताना नवनीत राणा यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. नवनीत राणा यांचा स्वभावच आधीपासूनच 'जिधर बम, उधर हम' असा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सपशेल फेल झाली असून राज्यात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावतो आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी केली होती. त्यांनी लोकसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता आणि आरोप केले होते कि, घरात बसून माझं कुटुंब माझी जबाबदारी हे कसं साध्य होणार. तसंच अशे अनेक गंभीर आरोप केले होते.
यावर पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या कि, खासदार नवनीत राणा काम शून्य करायचं आणि प्रसिद्धीसाठी त्यांना ओढ लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा ह्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवश्यावर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या पण लगेच त्यांनी रंग बदलला. त्यांचा स्वभावच आधीपासूनच 'जिधर बम, उधर हम' असा आहे. आणि विशेष म्हणजे नौटंकी जिथे करायची तिथेच खासदार नवनीत राणा असतात, असं ठाकूर म्हणाल्या.
विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात मागील सहा महिन्यात अमरावती जिल्ह्यात त्यांचं काहीच काम नाही. यशोमती ठाकूर म्हणाल्या कि, जर कोणाला कामच दिसत नसेल पण सोंग घेतलं असेल तर काम कसं दिसणार असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांना लगावला. याआधी ही 30 जुलैला अमरावतीच्या बडनेरा येथे कोरोना चाचणीच्या नावावर तरुणीच्या गुप्तांगाचं स्वॅब घेण्याचा विचित्र प्रकार घडला तेव्हा नवनीत राणा - यशोमती ठाकूर यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)