एक्स्प्लोर

महिलांची बदनामी प्रकरण : भारतीय संस्कृतीमध्ये अशा घटनांना स्थान नाही : जितेंद्र आव्हाड

ऑनलाईन महिलांची बदनामी प्रकरणावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. या घटना अतिशय निंदनीय असून, भारतीय संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नसल्याचे आव्हाड म्हणालेत.

मुंबई : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. ऑनलाईन अॅपवर महिलांचे फोटो अपलोड करुन त्यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यानंतर राजकीय नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनांचा निषेध केला आहे. हे अतिशय निंदनीय असून, 'भारतीय संस्कार आणि संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे धार्मिक राक्षस भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाहीत. हा देश Genocide कडे चालला आहे असे वाटायला लागले' असल्याचे आव्हाड म्हणालेत.

दरम्यान, मुस्लीम महिलांना टार्गेट करणाऱ्या  सुली डील्स, बुली बाई या अॅपच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर बुली बाई या अॅपविरोधात दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पत्रकार इस्मत अरा हिने कलम 153A (धर्माच्या आधारावर वैर वाढवणे), 153B(राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रतिकूल आरोप), 354A (लैंगिक छळ) या कलमाअंतर्गत दिल्ली पोलिसांमध्ये अज्ञांताविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 509 (शब्द, हावभाव किंवा स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतू) या कलमान्वये तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर मुंबई पोलिसांनी देखील संबंधित ट्विटर हँडल आणि 'बुली बाई' च्या विरोधात कलम 153A, कलम 153B, कलम 295A (धार्मिक श्रद्धांचा अपमान), 354D,कलम 509 तसेच कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) या  कलमातंर्गत गुन्हा नोंद केला  आहे.

मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केला होता. तसेच या प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ऑनलाईन पोर्टलवर महिलांची बदनामी करण्यात येत असून, हा मोठा गुन्हा आहे. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. याआधीही असे प्रकार घडले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना बदनाम करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मी पाठपुरावा करणार असल्याचे मलिक म्हणाले.

या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अशा घटनांचा निषेध केला आहे. तसेच महिला आयोग कार्यालयाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत. सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लिम महिलांचे फोटो, प्रोफाइल व त्यासमोर किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget