Gulabrao Patil : राष्ट्रवादीच्या नाराज लोकांनी साथ दिल्यानं संजय पवारांचा विजय : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil : राष्ट्रवादीमधील नाराज लोकांनी साथ दिल्यानं जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाल्याचे मत मंत्री संजय पाटील यांनी व्यक्त केलं.
Gulabrao Patil : जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Jalgaon DCC Bank Election) आम्ही कोणताही गाजावाजा केला नाही. मात्र, जनतेचा कौल काय होता हे या निवडणुकीतून कळाल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीमधील नाराज लोकांनी साथ दिल्यानं संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाल्याचे पाटील म्हणाले. सहकारात राजकारण नको या विचाराचे आम्ही आहोत. त्यामुळं जिल्ह्याच्या विकासासाठी पुढील काळात बँक चालवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसेंचं (Eknath Khadse) मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र भैय्या पाटील यांचा पराभव केला आहे. हा एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गुलाबराव पाटील प्रतिक्रिया दिली.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी तरी विकासाचा अदृश्य आत्मा आला आणि यामध्ये संजय पवार यांचा विजय झाल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. राष्ट्रवादीमधील नाराज लोकांनी साथ दिल्यानं पवार विजयी झाल्याचे पाटील म्हणाले. सत्ता हे साधन आहे. दादागिरी करुन चालत नाही. या खुर्चीवर बसण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याचाही हक्क असल्याचे पाटील म्हणाले. आजच्या या घडामोडीत आमदार मंगेश चव्हाण यांचं मोठं योगदान आहे. चव्हाण हे अदृश्य आत्मा आहेत ते कोठे ही जातात असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आजच्या निकालाने खडसेंचा अहंकार नष्ट झाला असेल : भाजप आमदार मंगेश चव्हाण
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. रावणाचा अहंकार ज्याप्रमाणं नष्ट झाला होता अगदी त्याच पद्धतीनं आजचा निकाल पाहता खडसे यांचा अहंकार नष्ट झाला असेल असे चव्हाण म्हणाले. आपला पुढील कार्यकाळ पाहता आता तरी तुमच्यात सुधारणा करुन घ्या, कारण तुमच्यामुळं तुमच्याच पक्षाचं नुकसान होत आहे हे आजच्या निकालावरुन सिद्ध झाल्याचे चव्हाण म्हणाले. येणारा काळ अजून खडतर राहणार आहे. जे मागील काळात खडसे सांगत होते की, संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद होणार आहेत त्यांच्याचसाठी आज जिल्हा बँकेचे मेन गेट बंद झाल्याची खोचक टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या: