एक्स्प्लोर
Advertisement
मांजरा धरणाची पाणीगळती तातडीने थांबवा : गिरीश महाजन
बीड : बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या दुरुस्तीचं काम तातडीने करण्यात यावं, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 'माझा'ने सर्वप्रथम ही पाणीगळती समोर आणल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.
मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करणाऱ्या दरवाजाचे रबर खराब झाल्याने या धरणातून एकूण साठ्यापैकी 7 टक्के पाणी गळती झाली आहे. आमदार संगिता ठोंबरे यांनी गिरीश महाजनांना यासंबंधी निवेदन दिलं.
मांजरा प्रकल्पासंबधी सर्व तांत्रिक अडचणी आमदार ठोंबरेंनी गिरीश महाजनांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी बीड आणि लातूर येथील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना फोनवरुन पाणीगळती संदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यास सांगितलं.
येत्या 15 दिवसात दुरूस्तीचे सर्व कामे पूर्ण करून पाणी गळती थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणी गळती दुरूस्तीसंबधी कामात कुठल्याही अधिकाऱ्याने कामचुकारपणा केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महाजन यांनी दिला आहे.
काय आहे मांजरा गळती प्रकरण?
मांजरा धरणाच्या 18 पैकी 4 दरवाज्यातून अविरत गळती सुरु आहे. कारण मे महिन्यात बदललेले रबरशेड कुचकामी ठरले आहेत. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांना कळवण्यात आलं. मात्र यासंबंधी कसलीही हालचाल झाली नाही.
धरणाच्या मुख्य भिंतीजवळ एअर काढण्यासाठी एअर पंप बसवण्यात आला आहे. त्याच्या भिंतीतूनही पाणी वाहतंय. धरणातून होणाऱ्या पाझराचं निरीक्षण करण्यासाठी मुख्य भिंतीजवळ निरीक्षण टँक बांधण्यात आलाय. तिथूनही गळती सुरु आहे.
तर चौथी गळती धरणाच्या उजव्या कालव्याला लागली आहे. या गळतीमुळे मांजरा नदी पुन्हा खळाळू लागली. त्यामुळे वाहत्या पाण्याला बांध घालून शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली.
भरलेल्या धरणातून पाणी वाया जात असल्याची माहिती 26 सप्टेंबरला देण्यात आली. अडीच महिन्यात गळती रोखण्याचे काहीही प्रयत्न झाले नाहीत. 11 डिसेंबरपर्यंत धरणातून 5 दशलक्ष घनमिटर पाणी वाहून गेलंय. म्हणजेच धरण 7 टक्के रिकाम झालं. जोपर्यंत पाणी पातळी कमी होत नाही तोपर्यंत काही करता येईल का, याबद्दल जलसंधारण विभाग साशंक आहे.
'माझा'ने सर्वप्रथम ही पाणीगळती होत असल्याचं समोर आणलं होतं.
मात्र आता जलसंपदा मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर धरणाची दुरुस्ती केली जाईल, अशी अपेक्षा आहे. कारण एकेकाळी दुष्काळाची राजधानी बनलेल्या लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून कोरडं ठाक पडलेल्या धरणात यावर्षी पाणी आहे. मात्र प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे आतापर्यंत धरणातील 7 टक्के पाणी वाया गेलं आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement