एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्री लोणीकरांकडून तक्रारकर्त्याला धमक्या, काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्यापासून आपल्याला आणि आपल्या परिवाराला धोका असून आपल्या जीवितास काही झाल्यास मंत्री लोणीकर जबाबदार असतील असेही त्यांनी म्हटले आहे.
जालना : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांच्या मुलाकडून मला धमक्या येत असल्याची तक्रार याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी केली आहे. मंत्री लोणीकरांनी कारखान्याच्या नावानं शेतकऱ्यांच्या पैशानं जमीन लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने जमीन लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार बळीराम कडपे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर साखर आयुक्तांसह जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना नोटीस पाठवली होती. दरम्यान या विषयीचे वृत्त एबीपी माझाने दिल्यानंतर याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.
मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्यापासून आपल्याला आणि आपल्या परिवाराला धोका असून आपल्या जीवितास काही झाल्यास मंत्री लोणीकर जबाबदार असतील असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या धमक्यांविरोधात आपण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करून पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
काँग्रेसकडून मंत्री लोणीकरांच्या राजीनाम्याची मागणी
चतुर्वेदेश्वर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून त्या पैशातून कारखान्याची जमीन परस्पर बळकावल्याच्या आरोपानंतर काँग्रेसने मंत्री लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय आणि लोणीकरांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या जालना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून उद्या लोणीकरांच्या कामाचा भांडाफोड करणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले आहे.
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर अडचणीत
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याच्या नावाखाली पैसे गोळा करून कारखान्यासाठी खरेदी केलेली जमीन नियमबाह्य आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
लोणीकर यांच्यावर शेतकऱ्यांची परतूर तालूक्यातील लोणी गावामधील 50 एक्कर जमीन चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने आपल्या घशात घातल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदार शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत आरोप केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या तक्रारीकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कानाडोळा केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
लोणीकर यांनी 2000 साली आमदार असताना, परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजारांच्या रकमा घेतल्या होत्या. त्याच्या शेतकऱ्यांना पावत्याही दिल्या. मात्र चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्यावरील नोंदणी क्रमांक देखील बोगस असल्याचा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय ज्या शेअर्समधून कारखाना उभा केला जाणार होता त्या चतुर्वेदेश्वर नावाच्या कारखान्याची साखर आयुक्तांकडे नोंदच नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
करमणूक
Advertisement