MIMला आधी आपण भाजप विरोधी आहोत, हे कृतीतून सिद्ध करावं लागेल : जयंत पाटील
Jayant Patil on MIM : एमआयएमला आधी आपण भाजप विरोधी आहोत, हे कृतीतून सिद्ध करावं लागेल, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत.
Jayant Patil on MIM : एमआयएमला आधी आपण भाजप विरोधी आहोत, हे कृतीतून सिद्ध करावं लागेल, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. त्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले की, "इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गेले होते. अशावेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे, राजेश टोपे यांनी ती केलेली नसेल. त्यामुळे या चर्चेबाबत काही वक्तव्य करण्याची आवश्यकता वाटत नाही."
"आतापर्यंत याचा अनुभव उत्तर प्रदेशात, महाराष्ट्रात त्यांचा प्रयत्न सिद्ध झाला आहे. ते जर बी टीम नसतील तर औरंगाबाद महापालिकेत त्यांचा रोल काय आहे? यावरुन आपल्या लक्षात येईल की, ते भाजपच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की, भाजपचा विजय होण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करण्यास उत्सुक आहेत? हे औरंगाबाद महापालिकेत कळेलच. इम्तियाज जलील आमच्याही चांगले ओळखीचे आहेत. विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण तरिही मला वाटत नाही की, राजेश टोपे यांनी त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा केली असेल. आणि त्यांच्या घरी कोणाचं तरी निधन झालं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती नाही की, राजकीय चर्चा करणं." , असं जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी : इम्तियाज जलील
एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा : इम्तियाज जलील