उत्तर अमेरिकेच्या रेड नेक फॅलेरॉप या पक्षाचे पालघरमध्ये दर्शन
पालघर जिल्ह्यात एकूण 380 हून अधिक देशी-विदेशी पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत.

पालघर : पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणि उथळ पाणथळ भागात दरवर्षी विविध देशी विदेशी पक्षी पाहायला मिळतात. साधारपणे थंडीच्या मोसमात अशा विदेशी पक्षांच्या स्थलांतरला सुरुवात होते. हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशांत भ्रमंती करत असतात. थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या माय देशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात.साधारणपणे फेब्रुवारी महिन्यांत यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. अशाच परतीच्या प्रवासात असलेल्या उत्तर अमेरिकेतील पक्षाचे पालघर मध्ये दर्शन झाले आहे.
एरवी या पक्षाची पिसे ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची दिसतात. पण जेव्हा हा पक्षी विणीचा हंगामात येतो तेव्हा ह्या पक्षाच्या पिसांना लाल रंग येऊ लागतो. छातीवरील पिसांना देखील राल रंग येण्यास सुरुवात होते. विणीच्या हंगामात येण्याची सुरुवात झाली असल्याने या पक्षाच्या पिसांचा रंग बदलण्यास आता सुरुवात होत आहे. या पक्षाचे दर्शन पालघरमध्ये सातत्याने या वर्षी देखील झाले आहे. आधी हा पक्षी पालघर जिल्ह्यातील चिंचणी मधील उथळ पाणथळ भागात 30 ऑक्टोबर 2016 रोजी त्याच्या नेहमीच्या हंगामात पहिला गेला होता. विणीच्या हंगामात हा पक्षी अधिकच आकर्षक दिसत असल्या कारणामुळे या पक्षाला पाहण्यासाठी पक्षी मित्र हजेरी लावत आहेत.
पालघरमधील नेस्ट या संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या विविध ठिकाणांच्या पक्षी मित्रांकडून पालघर जिल्ह्यात एकूणच 380 अधिक देशी-विदेशी हून अधिक पक्ष्यांच्या नोंदण्या करण्यात आल्या आहेत. पालघर मधील पक्षी निरीक्षक आशिष बाबरे , प्रविण बाबरे , भावेश बाबरे , हार्दिक दयाळ आणि नेस्ट या या संस्थेतील पक्षी मित्र या देशी विदेश स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदणी करत असतात.
संबंधित बातम्या :
Trending : जेव्हा आकाशात उडताना दिसला 'महाकाय पक्षी'! व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी थक्क, यामागचं सत्य काय?
In Pics : दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन, 100 छायाचित्रकारांनी टिपलेले फोटो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
