एक्स्प्लोर
एमएचटी-सीईटीचा निकाल आज जाहीर होणार
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 1 जून 2016 रोजी अर्थात उद्या जाहीर होणार आहेत. राज्यभरात 5 मे 2016 रोजी 56 केंद्रांवर 25 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
कुठे पाहाल निकाल?
www.dmer.org, www.mhtcet2016.co.in, www.mahacet.org, www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
'नीट'वरुन संभ्रम
मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’ ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती.
केंद्र सरकारचा अध्यादेश
'नीट'प्रश्नी राज्य सरकार फेरविचार याचिका केल्या. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अखेर केंद्र सरकारने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. या अध्यादेशानुसार राज्यात यंदा एमएचटी-सीईटीप्रमाणेच प्रवेश परीक्षा होईल. यामध्ये सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तर खासगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 'नीट'द्वारेच प्रवेश मिळणार आहे. यानुसार राज्यातील 2810 जागा या सीईटी परीक्षेतून भरल्या जातील.
संबंधित बातम्या
अखेर राष्ट्रपतींची ‘नीट’ अध्यादेशावर स्वाक्षरी
‘नीट’मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!
सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?
‘नीट’प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार
‘नीट’ प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही
‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश
तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement