एक्स्प्लोर
Advertisement
15 ऑगस्टपूर्वी राज्यात 'म्हाडा'च्या 14 हजार 621 घरांची लॉटरी
महाराष्ट्रात 14 हजार 621 घरांची लॉटरी निघणार आहे. तर मुंबईत गिरणी कामगारांसाठी 5 हजार 90 घरांची लॉटरी निघेल.
मुंबई : स्वतःच्या स्वप्नातील घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रात 14 हजार 621 घरांची लॉटरी निघणार असून मुंबईतील गिरणी कामगारांनाही घर घेता येणार आहे. येत्या 15 ऑगस्टच्या आधी लॉटरीची जाहिरात निघणार आहे.
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी राज्यभरातील गृहखरेदी इच्छुकांसाठी ही मोठी घोषणा केली. महाराष्ट्रात 14 हजार 621 घरांची लॉटरी निघणार आहे. तर मुंबईत गिरणी कामगारांसाठी 5 हजार 90 घरांची लॉटरी निघेल.
पुण्यात 2000, नाशिकमध्ये 92, औरंगाबादमध्ये 148, कोकणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 5300, नागपूरमध्ये 898, अमरावतीमध्ये 1200 घरांची सोडत जाहीर होणार आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वीच त्यासंबंधी जाहिरात काढण्यात येईल.
मुंबईत म्हाडाच्या घरांचं सेवा शुल्क कमी करण्यासाठी तत्वत: मान्यता मिळाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे घरांच्या किंमती कमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement