एक्स्प्लोर

वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; ‘हेरिटेज’ टचसह उभारणार वास्तू

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजूरी दिली.

मुंबई: वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजूरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.    

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक ता. हवेली, जि. पुणे येथील स्मारकाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढु बुद्रुक येथे उभारण्यात यावे. हे स्मारक उभारताना त्याला ‘हेरिटेज’ टच असावा, स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावे. या स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करण्यासाठी स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. या क्षेत्रातील तज्ञ मंडळी तसेच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचे स्वागत करुन त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा. स्मारक उभारणीचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन सर्वांना विश्वासात घेऊनंच काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Baba Siddique Shot Dead : सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले,  उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBaba Siddique Shot Dead Superfast : बाबा सिद्दीकी सुपरफास्ट : 13 ऑक्टोबर 2024 : abp majhaBaba Siddique Shot Dead : चौथा आरोपी तीन हल्लेखोरांना मार्गदर्शन करत असल्याचा संशयBaba Siddique Shot Dead :  सिद्दीकी गोळीबार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी ABP माझावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Baba Siddique Shot Dead : सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले,  उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Horoscope Today 13 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 13 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Embed widget