एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माध्यमांना प्रचार संपल्यानंतर जाहिरात देता येणार नाही
मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर माध्यमांना जाहिराती देता येणार नाहीत. शिवाय 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत जनमत चाचणी (ओपिनियन पोल) आणि एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही.
राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. निवडणुकांचा प्रचार मतदान सुरु होण्यापूर्वी 24 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे पहिल्या टप्पात 16 फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12 वाजता संपणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असलेल्या 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार 19 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता संपेल.
महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदानाच्या 48 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणाऱ्या 10 महानगरपालिकांचा प्रचार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपेल.
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या 14 ऑक्टोबर 2016 च्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. यात सोशल मीडियाचाही समावेश असेल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींबाबत समान नियमन असावं, अशी मागणी काही राजकीय पक्षांकडूनदेखील करण्यात आली होती, असं सहारिया यांनी सांगितलं.
14 फेब्रुवारी रोजी रात्री बारापासून ते 21 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत कुठल्याही माध्यमांद्वारे जनमत चाचणी आणि एक्झिट पोल चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहिल.
निवडणूक कार्यक्रम
- 14 फेब्रुवारीला रात्री 12 पासून पहिल्या टप्प्यातील 16 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठीचा प्रचार संपेल.
- 19 फेब्रुवारीला रात्री 12 पासून 21 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाचा प्रचार संपेल
- 21 फेब्रुवारीच्या महानगरपालिका मतदानासाठीचा प्रचार कालावधी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 पासून संपेल
- जनमत आणि एक्झिट पोल चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर 14 फेब्रुवारीपासून बंदी असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement