पुराच्या वेढ्याने मराठवाड्याची दैना, जूनपासून आतापर्यंत 84 जणांचा बळी, 3 हजारांहून नागरिकांचे स्थलांतर, धक्कादायक आकडेवारी समोर
या पूराच्या कहरातून गावकरी घाबरले असतानाच, मराठवाड्याचे प्रशासन आणि एनडीआरएफ, आर्मीच्या पथकांनी तातडीने मदत केली.

Marathwada Rain: मराठवाड्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेकडो गावं विस्कळीत झाली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले, तर पिके, घरं आणि जनावरे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. पूराच्या कहरातून 84 जणांचा बळी गेला, 13 जण जखमी झाले, 1,954 गाव पुरात सापडली असून 5,729 घरांची पडझड झाली. एनडीआरएफ, आर्मी आणि स्थानिक प्रशासनाच्या तातडीच्या मदतीमुळे 719 लोकांना पुरात अडकण्यापासून वाचले गेले.
मराठवाड्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेकडो गावं विस्कळीत झाली आहे.मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये महापुराने दैना केली आहे. मात्र, शेतीसुद्धा मातीसकट खरडून महापुरात गेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर जगायचं तरी कसं? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. (Flood) पूरस्थितीमुळे 3,259 नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षित स्थळी हलवावे लागले. यात बीड 1,115, परभणी 1,238, जालना 90, धाराशिव 498 आणि नांदेड 309 नागरिकांचा समावेश आहे. या पूराच्या कहरातून गावकरी घाबरले असतानाच, मराठवाड्याचे प्रशासन आणि एनडीआरएफ, आर्मीच्या पथकांनी तातडीने मदत केली.
पूरात अडकलेले लोक, जलद सुटका
मराठवाड्यात एकूण 719 लोक पुरात अडकले होते. एनडीआरएफ आणि आर्मीच्या पथकांनी या लोकांना सुटका केली. जालना 35, परभणी 3, बीड 185, लातूर 30, धाराशिव 466 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आज परिस्थिती नियंत्रणात असून, मराठवाड्यात एकही व्यक्ती पुरात अडकलेली नाही.
फक्त जीवितहानीच नव्हे, तर पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. 23 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात 27,29,779 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. 1,954 गावांमध्ये या पूराने प्रचंड नुकसान केले असून 34,10,349 शेतकऱ्यांची शेती प्रभावित झाली आहे. यापैकी 26,99,269 हेक्टर जिरायत पिकांचे, 14,088 हेक्टर बागायत आणि 16,422 हेक्टर फळपीक वाया गेली आहेत.
पंचनाम्यांची माहिती
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 20,81,720 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाली आहेत. विभागीय अहवालानुसार संभाजीनगर 1.21 टक्के, जालना 19.3 टक्के, परभणी 84.45 टक्के, हिंगोली आणि नांदेडमध्ये 100 टक्के, बीड 62.36 टक्के, लातूर 77.52 टक्के, धाराशिव 86.18 टक्के पंचनामे पूर्ण झाली आहेत. एकूण पाहता मराठवाड्यात सुमारे 76 टक्के पंचनाम्यांचा काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
जीवितहानी आणि नुकसान
1 जून ते 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात पावसामुळे 84 जणांचा बळी गेला, तर 13 जण जखमी झाले. 1,954 गावांमध्ये नुकसान झाल्याचे नोंदवले असून 2,231 लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. याशिवाय 5,729 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यानुरूप मृत्यूची संख्या: संभाजीनगर 15, जालना 7, परभणी 6, हिंगोली 11, नांदेड 24, बीड 11, लातूर 6, धाराशिव 4.
मराठवाड्यातील मुसळधार पावसाने फक्त लोकजीवनच नाही तर शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. प्रशासन, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनी अनेक लोकांचे प्राण वाचले असले तरी, पिकांचे आणि घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.
हेही वाचा
























