मराठवाड्यात पुढील २२ दिवस पावसाचा खंड? धरणे तहानलेलीच! जायकवाडीसह कोणत्या धरणात काय स्थिती?
मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र आहे.
![मराठवाड्यात पुढील २२ दिवस पावसाचा खंड? धरणे तहानलेलीच! जायकवाडीसह कोणत्या धरणात काय स्थिती? Marathwada dam water storage Jayakwadi dam 7 percent what is a condition of other dams मराठवाड्यात पुढील २२ दिवस पावसाचा खंड? धरणे तहानलेलीच! जायकवाडीसह कोणत्या धरणात काय स्थिती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/24/b9b2de72ae14b6a67e6d3182fa67f9a71695536763268737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathwada Dam water: राज्यात मध्य पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना मराठवाड्याला मात्र, अजून पावसाची प्रतिक्षाच आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात 59 टक्के पाऊस झाला आहे. मात्र नद्या आणि धरणे अजूनही कोरडीच असल्याचे चित्र आहे, त्यात ही परिस्थिती असताना पुढील 22 दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्याल्याने मराठवाड्यात चिंतेची परिस्थिती आहे.
जायकवाडी अवघ्या ७ टक्क्यांवर
सध्या जायकवाडी प्रकल्पात अवघा 7 टक्के पाणीसाठा आहे. या धरणसाठ्यात हळूहळू वाढ हाेत असली तरी सिंचनासह, शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे. मराठवाडा विभागात 11 मोठे, 75 मध्यम तर 749 लघु प्रकल्प आहेत. गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवर 42 बंधारे आहेत. एकूण 877 प्रकल्पांमध्ये अवघा 20 टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे.उत्यामुळं लघु आणि मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पिकांना दिलासा मात्र...
मराठवाड्यात पावसाळा सुरु झाल्यापासून 60 दिवसांत 21 दिवस पाऊस झाला आहे. पर्जन्यमापकांच्या आकड्यांनुसार विभागात 679.5 मि.मी.च्या तुलनेत 404.2 मि.मी. पाऊस झाल्याचे दिसते आहे. 59 टक्के पावसामुळे फक्त पिकांना दिलासा मिळाला आहे, धरणांत पाणी आलेले नाही.
बीड, हिंगोलीत काय स्थिती?
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील माजलगाव धरण अजूनही शुन्यावर आहे. मांजरा धरणात १.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण २८.५७ टक्के तर येलदरी ३१.७१ टक्के भरले आहे. राज्याच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा अजूनही सर्वात कमी असून तो केवळ १७.५६ टक्के एवढा आहे.
नांदेडला दिलासा, परभणीत काय स्थिती?
नांदेड जिल्ह्यातील निम्नमनार आता 50 टक्के भरले आहे तर विष्णुपुरी 94.23% भरल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणात 28.47% सीना कोरेगाव प्रकल्प अजून शून्यावरच आहे. परभणीतील निम्न दुधना प्रकल्पात केवळ 8.14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा:
शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज मिळणार, राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार? सरकारनं काढला जीआर
भारताची सीफूड निर्यात वाढली! महाराष्ट्रातून सध्या किती सागरी खाद्यपदार्थांची निर्यात होते?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)