एक्स्प्लोर
मुंबईत शिस्तबद्ध पद्धतीने मराठा समाजाची बाईक रॅली
मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजन समितीच्या वतीने मुंबईत जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. यामुळे संपूर्ण मुंबई आज भगवीमय झाली होती. मोठ्या संख्येने मराठा तरुण, तरुणी आणि महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या.
या रॅली दरम्यान शिस्तबद्ध पद्धतीचं अनोखं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. पण दुसरीकडे लालबाग, परळ या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलारही सहभागी झाले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने ठाण्याच्या मराठा मोर्चात सहभाग घेतला होता. त्यानंतर मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन शेलारांनी भाजपची छाप उमटवण्याचा प्रयत्न केला.
अपडेट :
मराठा समाजाची बाईक रॅली संपन्न, शिस्तबद्धतेचं अनोखं दर्शन
मराठा मोर्चा : बाईक रॅली सीएसटीहून लालबागकडे रवाना, रॅलीमुळे भायखळा ते परळदरम्यान वाहतूक कोंडी
मराठा मोर्चा : महापालिकेजवळ शिवप्रतिमेला अभिवादन करून बाईक रॅली भायखळाच्या दिशेने रवाना
मराठा मोर्चा : बाईक रॅली दादरजवळ पोहचली, रस्त्याच्या एका बाजूने बाईक्सची लांबच लांब रांग
मराठा मोर्चा : सोमय्या मैदान ते सीएसटी बाईक रॅली, हेल्मेट, भगवे फेटे घालून मोर्चेकरी रॅलीत सहभागी
मराठा मोर्चा : सायनपासून ते वडाळा डेपोपर्यंत बाईकची मोठी रांग, रस्त्याच्या एका बाजूला साधारण 4 किमीपर्यंत बाईकची रांग
मराठा मोर्चा : बाईक रॅलीमध्ये महिलांसह तरुणींचाही समावेश
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बाईकवरून मराठा मोर्चात सहभागी
मुंबईत सकाळी 9 वाजता चुनाभट्टी इथल्या सोमय्या ग्राऊंडवरुन या बाईक रॅलीला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे या बाईक रॅलीचा समारोप होणार आहे.
सोमय्या मैदानावरुन सकाळी 9 वाजता निघणारी ही बाईक रॅली सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशनसमोर पोहोचेल. सीएसटीला छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिला जाईल. तसंच कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहून रॅलीची सांगता होईल.
मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मूक मोर्चांचं आयोजन केलं जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशा मराठा समाजाच्या मागण्या आहेत.
अशी असेल रॅली
VIDEO : मुंबई : मराठा मोर्चा बाईक रॅलीचा मार्ग
VIDEO : मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचं लोण मुंबईत पोहोचणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement