एक्स्प्लोर

Maratha Reservation : एक उपमुख्यमंत्री जबाबदार, मनोज जरांगेंकडून फडणवीस टार्गेट; तुमच्याकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस, सरकारला अल्टिमेटम

Maratha Reservation : जरांगे यांनी पत्रकार परिषदेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या धमक्यांना घाबरणार नाही. अंगावर आल्यावर सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला.

अंतरवाली, जालना:  मराठा आरक्षणांसाठी उपोषणावर असलेले आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या धमक्यांना घाबरणार नाही. अंगावर आल्यावर सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला.

राज्यातील वातावरण खराब करण्यात एक उपमुख्यमंत्री खास करून जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्यामुळे भाजप संपत आली असल्याची बोचरी टीका जरांगे यांनी केली. 

तुमच्याकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस, सरकारला अल्टिमेटम

मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारने आज घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे म्हटले. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकारकडे आपण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी फक्त ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांनाच प्रमाणपत्र देणार असल्याचे म्हटले आहे. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. 

जरांगे यांचा फडणवीसांवर निशाणा

मनोज जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.  महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही सरकारला सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. एकदा झाले आता पुन्हा यापुढे सहन करणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले. नेत्यांचे घर कोणी जाळले आम्हाला माहिती नसल्याचे सांगत भाजप तुमच्या मुळेच संपायला आलाय असेही जरांगेंनी म्हटले. आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खातात, आता तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्ही किती ताकतवर आहेत, किती 307 करायचे ते करा असा आव्हानही जरांगे यांनी दिले. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्याच्या बाणेरमधील बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पुण्याच्या बाणेरमधील बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर शत्रू वैमानिकावर गोळीबार का करू शकत नाही? काय आहेत नियम? वाचा सविस्तर
लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर शत्रू वैमानिकावर गोळीबार का करू शकत नाही? काय आहेत नियम? वाचा सविस्तर
भेदरलेल्या पाकिस्तानच्या पुन्हा वल्गना, शाहबाज शरीफ म्हणाले; आम्ही युद्ध अन् शांतता दोन्हीसाठी तयार, भरातानं आता ठरवावं की....'
भेदरलेल्या पाकिस्तानच्या पुन्हा वल्गना, शाहबाज शरीफ म्हणाले; आम्ही युद्ध अन् शांतता दोन्हीसाठी तयार, भरातानं आता ठरवावं की....'
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी,
साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी, "मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा" उपक्रमाकडून मानवंदना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Masood Ajhar : वाचलेल्या मसूद अजहरला पाकिस्तान 14 कोटी रुपये देणार? अड्डे वसवणार? Special ReportBeed Girl Case : मतीमंद मुलीला बापाकडून अमानुष वागणूक, बीडमधील धक्कादायक प्रकारPakistan Water Issue : वॉटर स्ट्राईक, भारतानं पाणी अडवल्यानं पाकमधील शेती धोक्यातIndia vs Pakistan Special Report : भारताचा धाक, बेचिराख पाक; पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्याच्या बाणेरमधील बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पुण्याच्या बाणेरमधील बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर शत्रू वैमानिकावर गोळीबार का करू शकत नाही? काय आहेत नियम? वाचा सविस्तर
लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर शत्रू वैमानिकावर गोळीबार का करू शकत नाही? काय आहेत नियम? वाचा सविस्तर
भेदरलेल्या पाकिस्तानच्या पुन्हा वल्गना, शाहबाज शरीफ म्हणाले; आम्ही युद्ध अन् शांतता दोन्हीसाठी तयार, भरातानं आता ठरवावं की....'
भेदरलेल्या पाकिस्तानच्या पुन्हा वल्गना, शाहबाज शरीफ म्हणाले; आम्ही युद्ध अन् शांतता दोन्हीसाठी तयार, भरातानं आता ठरवावं की....'
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी,
साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी, "मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा" उपक्रमाकडून मानवंदना
पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज; रुग्णालयातील सुरक्षा गार्डचं निघाला आरोपी
पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज; रुग्णालयातील सुरक्षा गार्डचं निघाला आरोपी
प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन आधारित 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा : देवेंद्र फडणवीस
'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट'च्या प्रारुपावर प्राथमिक चर्चा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंची उपस्थिती
Gopichand Padalkar: ज्याच्या डोक्यावर टिळा त्यांच्याकडूनच खरेदी करा, हलालचा पैसा हिंदूविरोधी कारवायांसाठी वापरला जातो: गोपीचंद पडळकर
ज्याच्या डोक्यावर टिळा त्यांच्याकडूनच खरेदी करा, हलालचा पैसा हिंदूविरोधी कारवायांसाठी वापरला जातो: गोपीचंद पडळकर
महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन समुहामध्ये सामंजस्य करार, राज्यात 5127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक;  27510 रोजगाराच्या संधी 
महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन समुहामध्ये सामंजस्य करार, राज्यात 5127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक;  27510 रोजगाराच्या संधी 
Embed widget