एक्स्प्लोर

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा आदेश निघाला, राज्यात 26 फेब्रुवारीपासून 10 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरु

Maratha Reservation: आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातंर्गत नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण लागू झाले आहे. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. सध्या राज्यात आधीपासूनच सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल.

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची (Maratha Reservation) आता राज्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. २६ फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. यासंदर्भात शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातंर्गत नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण लागू झाले आहे. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. सध्या राज्यात आधीपासूनच सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल. परंतु, २६ फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी 10 टक्के जागा आरक्षित असतील. 

सरकारची दुहेरी रणनीती

राज्य सरकारने एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. मनोज जरांगे यांच्यावर कालच बीडमधील दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच सरकारमधील नेते आणि मंत्रीही मनोज जरांगे यांच्याविरोधात उघडउघडपणे बोलू लागले आहेत.

मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणीही सुरु केली आहे. 26 फेब्रुवारीपासून या आरक्षणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारने जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर  दुसरीकडे आरक्षणाची अंमलबजावणी सुरु केली आहे. राज्य सरकारची ही दुहेरी रणनीती आता कितपत यशस्वी ठरणार, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Maharashtra Assembly Elections 2024 : शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 11 November 2024Bala Nandgaonkar on Mahim : ..पण अजूनही वेळ गेलेली नाही, बाळा नांदगावकरांचं सर्वात मोठं वक्तव्य!Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे ट्रम्प यांचाही राजीनामा मागू शकतात, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्तुत्तरUddhav Thackeray  Bag Check : मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅग तपासल्या, मविआचे नेते भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Maharashtra Assembly Elections 2024 : शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Embed widget