एक्स्प्लोर

कुणबी प्रमाणपत्र देणं निव्वळ अशक्य? मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, कारण...

Maratha Reservation News: मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता1967 पर्यंतच्या 34 लाख अभिलेखांपैकी केवळ 4 हजार 160 अभिलेखांवर कुणबी नोंद आढळली

Maratha Reservation News: मराठा समाजाला (Maratha Reservation Updates) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत असताना एक अतिशय मोठी बातमी आली आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्यातील 1967 पर्यंतच्या 34 लाख अभिलेखांपैकी केवळ 4 हजार 160 अभिलेखांवर कुणबी नोंद आढळली आहे. याचा अर्थ असा की, निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीनंतर विभागीय आयुक्तांकडे ही आकडेवारी करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता, सरकारनं जीआर बदलला नाही तर 99 टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्यच दिसतंय. मराठा समाज अभ्यासकांच्या दाव्यानुसार, सध्या मराठवाड्यात या समाजाची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 20 लाख इतकी आहे. मात्र गेल्या 5 वर्षांत केवळ 632 जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं दिसून आलं आहे. 

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीनंतर विभागीय आयुक्तांकडे सादर झालेली आकडेवारी पाहता…

  • मराठवाड्यातील 1967 पर्यंतच्या 34 लाख अभिलेखांपैकी केवळ 4160 वर कुणबी नोंद आढळली 
  • सरकारने जीआर बदलला नाही तर 99 टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणे अशक्यच
  • गेल्या 5 वर्षांत केवळ 632 जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. 
  • मराठा समाज अभ्यासकांच्या दाव्यानुसार, सध्या मराठवाड्यात या समाजाची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 20 लाखांवर 

दरम्यान, महसुल शैक्षणिक अभिलेखांची तपासणी करु शकले. त्यापैकी केवळ 4960 अभिलेखात कुणबी नोंद आढळली, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी यांनी दिली. याचा अर्थ असा की. निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही

पाहा व्हिडीओ : Kunbi Caste Certificate देणं निव्वळ अशक्य?  मराठवाड्यातील Maratha समाजाच्या मागणीला मोठा धक्का?

अभिलेखांच्या तपासणीनंतर केवळ 4160 कुणबी नोंदी 

मराठवाड्यातील मराठा समाजाला निजाम राजवटीतील कागदपत्रांच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. निजाम राजवटीत मराठवाड्यात पाच जिल्हे होते. ते पाच जिल्हे म्हणजे, बीड, औरंगाबाद, उस्मानाबद, परभणी आणि नांदेड. या पाच जिल्ह्यांतले जवळपास 33 लाख 98 हजार अभिलेख तपासले गेले आहेत. हे वृत्त दैनिक दिव्य मराठीनं प्रकाशित केलं आहे. त्यांच्याशी बोलत असताना विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी सांगितलं की, 33 लाख 98 हजार अभिलेखांच्या तपासणीनंतर त्यापैकी केवळ 4160 नोंदी या केवळ कुणबी समाजाच्या असल्याचं आढळलं आहे. तसेच, विभागीय आयुक्तांनी जिल्हावारही आकडेवारी सांगितली आहे. औरंगाबादेत 24, जालना 356, बीड 851, परभणी 2660, हिंगोली 11, उस्मानाबाद 101, लातूर 45 आणि नांदेडमध्ये 51 अशा नोंदी अभिलेखांवर आढळल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis :  व्होट जिहाद शब्दासाठी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तक्रारSharad Pawar on Reservation : आरक्षणावर पवारांनी कोणता तोडगा सुचवला ?Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaJob Majha : अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
Salil Ankola : धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
Embed widget