एक्स्प्लोर

खासदार संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर अजित पवार म्हणाले, सहा तारखेपर्यंत काहीतरी मार्ग निघेल...

राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय झाला नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगेरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  सहा तारखेला अजून वेळ आहे. तोपर्यंत काहीतरी मार्ग निघेल.

पुणे : 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगेरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  सहा तारखेला अजून वेळ आहे. तोपर्यंत काहीतरी मार्ग निघेल. चर्चा होईल. काहींना यातून फक्त राजकारण करायचंय, असं पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की, काही पक्षांनी या मुद्यासाठी रस्त्यावर उतरू अशी भूमिका घेतलीय पण कशासाठी उतरायचं. चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावर उतरा असं म्हटलंय. त्यांचं एकावे लागेल. आता मी, राजेश टोपे देखील मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Maratha Reservation : 6 जूनपर्यंत आरक्षणासंदर्भात भूमिका घ्या, अन्यथा रायगडावरुन... खासदार संभाजीराजेंचा इशारा, केल्या या मागण्या....

काय म्हणाले खासदार संभाजीराजे

6 जून, राज्यभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगेरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला आहे. ते म्हणाले की, मी राज्यसभेचा पगार घेतो, ती माझी जबाबदारी आहे. आता लोकांची जबाबदारी नाही तर ती आता आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संभाजीराजेंची केल्या या मागण्या

मराठा समाजाच्या प्रश्नासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.  9 ऑगस्टला क्रांती दिवस आहे.  सर्व खासदाराना मी विनंती करतो. दिल्लीत गोलमेज परिषद होणार असल्याचं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे म्हणाले की, अनेक लोकांची इच्छा आहे की आपण ओबीसीमध्ये जावा. नवीन प्रवर्ग तयार करता येतो का हे शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पाहिजे.  वंचितांना पहिलं आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मी मगाशी उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकलं.  तुमच्या हातात आहे ते तुम्ही करू शकता, असं ते म्हणाले. 

9 सप्टेंबर 2020 च्या आधी झालेल्या नियुक्त्या करून टाका अस सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.  राज्याच्या हातात ते आहे मग करून टाका.  कशाला ठेवता, लोकं अक्षरशः रडत आहेत, असं ते म्हणाले.  सारथीच्या समितीमध्ये समाजाची माणसं घ्या.  आयएएस अधिकारीच का?  सारथीला किमान एक हजार कोटी रुपये द्या.  अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनर्उभारणी झाली पाहिजे.  हे तुमच्या हातात आहे ते तर द्या.  30 टक्के श्रीमंत आहे त्यांना सोडून द्या पण 70 टक्के गरीब आहे त्यांना तर सवलती दिल्या पाहिजे, असं ते म्हणाले. 

आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही

आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ आहे. मी असल्यामुळं मराठा समाज शांत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मी सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे.  कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही.  मी महाराजांचा वंशज आहे.   1917 ला शाहू महाराज म्हणाले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही तर मी शिपाई म्हणून नेतृत्व करायला आलो आहे. आता आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही.  ऑगस्ट 2017 मध्ये मी आझाद मैदानात स्टेजवर गेलो आणि भूमिका घेतली कारण त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार होती.  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो सर्वोच्च होता.  मी त्यावेळी भूमिका घेतली माझ्यावर टीका झाली. आम्हाला भांडण करण्यात घेणंदेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे. समाजाला वेठीस धरू नका, असं ते म्हणाले. 

खासदार संभाजीराजे म्हणाले की,  खासदार आणि आमदार यांची ही जबाबदारी होती.  मी नाशिकमध्ये अस्वस्थ होऊन आक्रमक झालो.   लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौरा केला.  लोक आक्रमक आहेत. ते माझ्यामुळे शांत आहे. 30 टक्के श्रीमंत मराठे लोक आहेत ते  रस्त्यावर येत नाहीत 70 टक्के गरीब लोक रस्त्यावर येत आहेत.  मी तीन पर्याय सांगितले आहेत ते सर्वांनी मान्य केले आहेत, असं त्यांनी सांगितलं. 

संभाजीराजे यांनी सांगितलेले तीन मुद्दे

  • रिव्हीव्ह पिटीशन दाखल करायला 4 तारीख आहे पण कोविड मुळे ती पुढे गेली आहे.  रिव्हीव्ह पिटीशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर फुलप्रुफ असावा हा पहिला पर्याय.
  • दुसरा पर्याय क्युरिटीव्ह पिटीशन हा आहे
  • तिसरा पर्याय 342-A नुसार राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव जाईल तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे जाईल

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Beed Crime Walmik Karad: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का, पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का, पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली
Palghar Crime News: आलिशान कारमधून अवैध गुटखा तस्करी, कारवर भारत सरकार अन् भाजपचा झेंडा; नेमकं काय घडलं?
आलिशान कारमधून अवैध गुटखा तस्करी, कारवर भारत सरकार अन् भाजपचा झेंडा; नेमकं काय घडलं?
NEET Exam Paper: रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री...; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप
रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री...; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget