एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे
जालना : कोपर्डीमधील अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या विराट मूक मोर्चाचं लातूर, जालना आणि अकोल्यात आज आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान जालन्यात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसात राज्यातील विविध शहरांत हे मूक मोर्चे काढण्यात आले आहेत. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चांना सुरुवात झाली. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, यासोबतच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, अशा मागण्या या मोर्चांद्वारे करण्यात येत आहेत.
मराठा क्रांती मूक मोर्चांच आयोजन नांदेड, फलटण आणि इंदापूरमध्ये काल करण्यात आलं होतं. या मोर्चांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. यानंतरही मराठा क्रांती मूक मोर्चांच आयोजन राज्यातील विविध शहरांमध्ये करण्यात आलं आहे. यात पुणे, सातारा, सांगली नवी मुंबई आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे.
मराठा समाजाच्या मूक मोर्चे हे दलितविरोधी नसल्याचं सांगत प्रतिमोर्चे न काढण्याचं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या :
सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार
मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री
मराठा मोर्चांवर सर्व नेत्यांनी एकत्रितपणे चर्चा करावीः मुख्यमंत्री
मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं मत
विनायक मेटे आणि मराठा मोर्चांचा संबंध नाही : मराठा संघटना
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली
मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
मराठा समाजाच्या आक्रोशाला ‘सैराट’ सिनेमाच जबाबदारः आठवले
हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अयोग्य, मात्र... : नागराज मंजुळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement