(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आंदोलक उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी धडकले, मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मराठा समजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आंदोलन केले आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह इतरही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन खासदार शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यासाठी मराठा आंदोलकांच्या (Maratha Protest) गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला होता
उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे आंदोलक नाराज
मराठा आंदोलकांच्या या भूमिकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज मातोश्रीसमोर आंदोलन करणार आहे. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने काल (29 जुलै) मातोश्रीवर धडक दिली होती. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. मात्र सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला न भेटता उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले होते. ठाकरेंची भेट न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज मातोश्रीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन केले.
पोलिसांनी मातोश्रीबाहेर बंदोबस्त वाढवला
उद्धव ठाकरे जबाब दो ! असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. 30 जुलैच्या दुपारी 12 वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या याच भूमिकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मातोश्रीच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
अगोदर आम्ही विरोधकांना मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे, असे विचारणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे भेटले नाही तर आम्ही मातोश्रीबाहेरच ठिय्या मांडी, असा इशारा आंदोलकांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
विशाळगडावरील हिंसाचार का रोखला नाही? पोलिसांनी कोर्टात न्यायाधीशांसमोर सांगितलं मती गुंग करणारं कारण