विशाळगडावरील हिंसाचार का रोखला नाही? पोलिसांनी कोर्टात न्यायाधीशांसमोर सांगितलं मती गुंग करणारं कारण
Vishalgad Violence : गड परिसरातील कोणत्याही निवासी बेकायदा बांधकामांवर कारवाई केली गेली नाही. केवळ न्यायालयीन संरक्षण नसलेल्या व्यावसायिक आस्थापनांवरच कारवाई करण्यात आल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला.
![विशाळगडावरील हिंसाचार का रोखला नाही? पोलिसांनी कोर्टात न्यायाधीशांसमोर सांगितलं मती गुंग करणारं कारण Vishalgad violence case police and Maharashtra government claimed difficulties in taking action due to heavy rains Kolhapur Marathi News विशाळगडावरील हिंसाचार का रोखला नाही? पोलिसांनी कोर्टात न्यायाधीशांसमोर सांगितलं मती गुंग करणारं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/30/02eda31eadb39a215cae5705b92baa3a1722315117637923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार (Vishalgad Violence) प्रकरणात पोलीस (Police) आणि राज्य सरकारने (Maharashtra Government) उच्च न्यायालयात (High Court) अजब दावा केला आहे. तोडफोडीवेळी अतिवृष्टी (Heavy Rain) आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करता आली नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
गड परिसरातील कोणत्याही निवासी बेकायदा बांधकामांवर कारवाई केली गेली नाही. याउलट, केवळ न्यायालयीन संरक्षण नसलेल्या व्यावसायिक आस्थापनांवरच कारवाई करण्यात आल्याचा दावाही सरकारतर्फे यावेळी करण्यात आला. तसेच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje), पुण्यातील हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे कारवाईत अडचणी
कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या (Kolhapur Police Station) वरिष्ठांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, दोन पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा ताफा 13 जुलैला विशाळगडावर तैनात करण्यात आला होता. मुसळधार पाऊस, धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे, चकवा देऊन काहीजण गजापूर गावात शिरले होते. त्यांच्याकडून संपत्तीची नासधूस केली गेली. यामुळे गड परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पुण्यातील हिंदू बांधव समितीचे पडवळ आणि त्यांचे सहकारी 29 जून रोजी गडावर जाणार होते. त्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, 14 जुलै रोजी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यादिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेकजण पावनखिंडीतून विशाळगडाकडे जातात. त्यामुळे, लोकांना परवानगी द्यायची की नाही या गोंधळात अधिकारी होते.
18 पोलीस जखमी झाल्याचा पोलिसांचा दावा
समाजकंटक आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणारे कोण यांच्यात फरक करणे कठीण झाले होते. परिणामी, हिंसाचार सुरू झाला. त्यावेळी पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, जमावाकडून त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यात 18 पोलीस जखमी झाले होते. त्यातील दोघे गंभीर जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे, परंतु रवींद्र पडवळ फरारी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
विशाळगड हिंसाचारावरुन अबू आझमी संतप्त; आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)