एक्स्प्लोर
बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह, रिक्षाचालकाने हटकल्याने तरुण-तरुणी पसार
या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितलं. परंतु बॅगचा जडपणा आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रिक्षाचालकाने त्याबाबत विचारणा केली.
नागपूर : नागपुरात तरुण-तरुणीच्या बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माटे चौकात रात्री 2.30 वाजता हे दोघे एक मोठी बॅग घेऊन जात होते.
या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितलं. परंतु बॅगचा जडपणा आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रिक्षाचालकाने त्याबाबत विचारणा केली. यामुळे घाबरल्याने तरुण-तरुणी बॅग तिथेच ठेवून माटे चौकातून पसार झाले.
यानंतर रिक्षाचालकाने राणा प्रतापनगर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. पहाटे तीनच्या सुमारास पोलिस स्टेशनमध्ये बॅग आणून ती उघडली असता, त्यात 35-40 वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला.
हे तरुण-तरुणी कोण होते? मृत पुरुष कोण होता? त्यांनी हत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement