एक्स्प्लोर

जनावरांची तस्करी करणारे तिघेजण ताब्यात, मनोर पोलिसांनी कारवाई

पाठलाग करून मनोर पोलिसांनी गायींची तस्करी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं आहे.

पालघर : गोवंशाच्या जनावरांची तस्करी करुन पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारून भरधाव वेगात पळून जाणाऱ्यांना यशस्वीरित्या पोलिसांनी अटक केली आहे. मनोर पोलिसांनी ही कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल एक टन गोमांस जप्त केले आहे. रविवारी (ता.2 जानेवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास मनोर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेल्या कार मधून दोन जीवंत बैल आणि पीक अप टेम्पो मधून गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मनोर वाडा रस्त्यावरून गोवंशाच्या जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे तीन वाजता मनोर-वाडा रस्त्यावरील टेन नाका येथे नाका बंदी केली. ज्यावेळी सकाळी सात वाजताच्या सुमारास महामार्गावरून टेन नाक्याच्या दिशेने आलेल्या संशयास्पद कार आणि पीक अप टेम्पो चालकाला पोलिसांना थांबण्याचा इशारा दिला. परंतु कार चालकाने नाका बंदीवरील पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारून कार महामार्गावर वळवून गुजरातच्या दिशेने पळवली. ज्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन कारला रोखण्यात यश मिळवलं. यावेळी विक्रमगडच्या हद्दीत भोपोली गावातील नागरिकांनी देखील पोलिसांची मदत करत आरोपींना अटक केले. यावेळी गुंगीत असलेले दोन जीवंत बैल आणि कार मनोर पोलीसांनी जप्त केली आहे.

मनोर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 01 / 2022 याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 353,279,337,307,379, 338,429,34 सह महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा 1976 चे कलम 6,9,11,महाराष्ट्र प्राणी रक्षणा ( सुधारणा ) अधिनियम 1995 चे कलम 5.5 ( सी )9, 9 ( अ ) , 9( बी ) सह मोटार वाहन अधिनियम कलम 139, 177,184,187,134 ( अ ) ( ब )66( 1) 192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शब्बीर अहमद शगिर अहमद शेख,(वय 50), शरीफ हनिफ कुरेशी (वय.35) आणि तबरेज फारुख शेख (वय 22) अशी अटक केलल्या आरोपींची नावं आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget