एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवडमध्ये भर रस्त्यात तरुणाची हत्या, गेल्या 10 दिवसातील 4 थी हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचे सत्र सुरूच आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 9 च्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

पुणे : सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना, पिंपरी चिंचवडमधील हत्या सत्र सुरूच आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 9 च्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यात सिमेंट ब्लॉक ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सुनील सगर (वय, 35) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सुनील सगर हा युवक जीव वाचविण्यासाठी चिखलीमधील एका दुकानात धावला होता. पण आरोपीने तिथे सर्वांदेखत अमानुषपणे मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर दुकानातून बाहेर येताच सीमेंट सिमेंट ब्लॉकने ठेचून सुनील सगर या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, पिंपरी चिंचवडमधील हत्या सत्र काही केल्या थांबत नसल्याने हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागच्या काही दिवसात सातत्याने पिपंरी चिंचवडमध्ये हत्येच्या घटना घडत आहेत. 18 डिसेंबरला पिंपळेगुरवरमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये योगेश जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती.  गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली होती. त्यानंतर 22 डिसेंबरला तळेगावमध्ये इंस्टाग्रामवरील स्टेटस प्रकरणावरुन अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दशांत परदेशी असं हत्या जालेल्या 17 वर्षीय मुलाचे नाव होते. एका बंद पडलेल्या कंपनीसमोर मुलाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला पेलवान नागेश कराळेवर दहा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. खेड तालुक्यात ही घटना घडली होती. हा सर्व प्रकार देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्यानंतर 31 डिसेंबरच्या रात्री घडलेली हत्येची घटना. दरम्यान, गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 4 हत्येच्या घटना घडल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले
अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले
Raj Thackeray: भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही पण एक दंतकथाचं; पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य
भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही पण एक दंतकथाचं; पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget